लातूर (प्रतिनिधी)
लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथील ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. उन्मेष मारोती शेकडे यांच्या ‘शाळंची पाखरं’ या बालसाहित्य कलाकृतीने राज्य विक्रम (State Record) बालमनाचा शोध घेणारा पंचाक्षरी काव्यसंग्रह म्हणून भारतातील रेकॉर्ड्ससाठीचे एक प्रतिष्ठित प्रकाशन आणि जागतिक विक्रमांचे दस्तऐवजीकरण करणारे वार्षिक पुस्तक असलेल्या महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये नोंद झाल्याची माहिती रेकॉर्ड बुकचे मुख्य संपादक डॉ. सुनील दादा पाटील यांनी नुकतीच पत्रकाद्वारे दिली.
(ads)
प्रा. डॉ. उन्मेष मारोती शेकडे (जन्म २३ जून १९७१) द्वारा लिखित ‘शाळंची पाखरं’ हा बालकाव्यसंग्रह मराठी भाषेतीलच नव्हे तर जगातील सर्वच भाषांपैकी जगातील शाळंला प्रारंभी जाणार्या बालकांचा प्रथमच ‘पंचाक्षरी’ काव्यातून घेतलेला बाल मानसिकतेचा शोध ठरला असून यात विश्वात शाळंत जाणार्या बालमनांच्या आठवणी असून यामुळे हा वैश्विक साहित्य क्षेत्रातील एक आगळावेगळा आणि अत्यंत प्रेरणादायी असा काव्यसंग्रह ठरला आहे.
(ads)
प्रा. डॉ. उन्मेष मारोती शेकडे यांचा ‘शाळंची पाखरं’ हा बालकाव्यसंग्रह जगातील बालकांच्या मनाचा पहिल्याच दिवशी शाळंत जाताना व घरी येताना बालमनाच्या मानसिक आंदोलनाचा शोध घेणारा काव्यसंग्रह ठरला आहे. शालेय जीवनापासूनच त्यांच्या मनात कवितेची आवड निर्माण झालेली आहे. ते सध्या स्वामी विवेकानंद महाविद्यालय, शिरूर ताजबंद, तालुका - अहमदपूर, जिल्हा - लातूर येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी कविता, नाटक, कादंबरी व समीक्षा लेखन केलेले असून त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्यांनी अनेक शोधनिबंध लिहिले असून विविध स्तरावरील चर्चासत्रात सक्रिय सहभाग घेतला आहे.
(ads)
जगातील सर्व भाषांपैकी भारतातील मराठी भाषेत बालमानसिकतेचा शाळंच्या आरंभीच्या काळातील शोध घेणारा ‘शाळंची पाखरं’ हा ‘पंचाक्षरी’ काव्यसंग्रह एकमेव ठरला असून तो गुरुजी व पुस्तकांच्या संगतीतून बालकांना ज्ञानातून विश्वप्रेमात कसा बदलतो याचा नाविन्यपूर्ण शोध घेणार्या ‘शाळंची पाखरं’ या बालकवितासंग्रहातील वैश्विकपातळीवरून ७४ बालकाव्य मराठी भाषेत शब्दबद्ध केलेले आहेत. त्यामध्ये ३९५ कडवे, ०१ ध्रुपद कडवं, ओळींची संख्या १५८२, यमक जुळणी २९१, दीर्घकविता ११, कविता ६३ यांचा समावेश असून या वैशिष्ट्यांमुळेच सदर काव्यसंग्रह नाविन्यपूर्ण आणि एकमेवाद्वितीय ठरला असून त्यांच्या या बालकाव्यसंग्रहाची व साहित्य विषयक अन्य विशेष बाबींची दखल घेऊन त्यांच्या अद्वितीय विक्रमाची नोंद महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये राज्य विक्रम म्हणून १५ ऑगस्ट २०२५ रोजी करण्यात आली असल्याची माहिती रेकॉर्ड बुकचे मुख्य संपादक डॉ. सुनील दादा पाटील यांनी दिली.
(ads)
कवितासागर इंटरनॅशनल मीडिया ग्रुप, जयसिंगपूर, जिल्हा - कोल्हापूर यांच्या अंतर्गत कार्यरत असलेली महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस् ही एक जागतिक स्तरावरील नामांकित प्रकाशन आणि जाहिरात संस्था आहे; जी राज्य, राष्ट्रीय आणि जागतिक विक्रमांची सूची बनवते, विषयानुरूप यादी करून ती सत्यापित करते. यामध्ये नवीन रेकॉर्ड स्थापित करणे आणि जगभरातील मागील रेकॉर्ड अस्सल प्रमाणीकरणासह मोडणे इत्यादि बाबी समाविष्ट आहेत.
(ads)
प्रा. डॉ. उन्मेष मारोती शेकडे यांच्या राज्य विक्रमाची नोंदणी प्रक्रिया पार पाडताना भागवत नारायणराव खंडापुरे, नंदकुमार दिगंबरराव बालूरे, रामचंद्र मधुकर चव्हाण, संजीवनी बळवंत भिंगारे आणि प्रिन्स सुनील पाटील यांनी निरीक्षक आणि साक्षीदार म्हणून काम पाहिले.
प्रा. डॉ. उन्मेष मारोती शेकडे यांच्या या अत्यंत प्रेरणादायी विशेष यशाबद्दल आणि साहित्य विषयक कामगिरीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.



