विवरे ता.रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा ) : रावेर तालुक्यातील विवरे भाटखेडा रस्त्यावर येणारे बेघर वस्तीतील सांडपाण्याची रुमस्या ग्रामपंचायत व ग्रामस्यां साठो डोके दुःखी ठरली आहे.हि जटील समस्या सोडविण्याचे निवेदन माजी सरपंच वासुदेव नरवाडे यांनी आमदार अमोल जावळे यांना गुरुवारी दिले.सदर समस्या कायमची सोडविण्यासाठी नविन गटार बांधकामाला त्वरीत मंजुरी मिळवून देण्याचे आश्वासन आमदार अमोल जावळे यांनी दिल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे .
(ads)
रावेर तालुक्यातील विवरे बु॥ येथील विवरे- भाटखेडे या रस्त्यावर बेघरवस्तीचे सांडपाणी येत असल्याने रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. सांडपाणी रस्त्यावर साचल्याने रस्ता मृत्यूशय्येवर असुन शेवटची घटिका मोजत आहे . रस्त्याला तलावाचे रूप प्राप्त झाले आहे. या रस्त्यावरून चालताना लहान मुले, विद्यार्थी, महिला, जेष्ठ नागरिक तसेच नवीन बेघर,जुने बेघर, तांडा परिसरातील लोकांना गटारीचे सांडपाणी रस्त्यावर येत असल्याने त्रास होत आहे. यामुळे परिसरातील नागरीकांना रोगराईची शक्यता आहे.
(ads)
रस्त्यावर येणाऱ्या सांडपाण्याची विल्हेवाट लावण्या संदर्भात गेल्या पंधरवाड्यात रावेर येथे जिल्हा परिषदच्या माध्यमातून आयोजित केलेल्या तक्रार निवारण बैठकीत माजी सरपंच वासुदेव नरवाडे यांनी भाटखेडा रस्त्याची दूरदर्श व नागरिकांचे होणारे हाल याबाबत विदारक चित्र मांडले होते.सदर समस्येवर कायमचा तोडगा निघावा. यासाठी आमदार अमोल जावळे यांना सांडपाण्याची विल्हेवाट लावून समस्या सोडविण्यासाठी माजी सरपंच वासुदेव नरवाडे यांनी निवेदन दिले. निवेदनाची दखल घेत आमदार अमोल जावळे यांनी त्वरीत समस्या सोडवून नागरीकांची होणारी गैरसोय दुर करतो . यासाठी नविन गटार बांधकाम मंजूरीसाठी पाठवतो. लवकरच समस्या सोडविण्याचे आमदार अमोल जावळे यांनी आश्वस्त केले .
(ads)
विवरे- भाटखेडा रस्त्याच्या रस्त्यावरील सांडपाण्याचे विल्हेवाट करिता नवीन गटार बांधकाम करिता निधी उपलब्ध करून देत असल्याने आमदार अमोल जावळे यांचे कौतुक करून समस्या सुटणार असल्याने ग्रामस्थां मध्ये आनंदाचे वातावरण आहे.