रावेर तालुका प्रतिनिधी (प्रशांत गाढे)
रावेर तालुक्यातील रेंभोटा ग्रामपंचायत येथे गेल्या दोन महिन्या पासून पथदिवे बंद पडलेले असून पावसाचे दिवस असल्याने साप, विंचू असे जनजनावर या रस्त्यावर येऊन अंधारात जाणार्या-येणार्याला दंश करण्याची शक्यता नाकारता येत नाही.गावातील वस्ती मध्ये दिवे बसविण्या साठी ग्रामविकास अधिकारी व सरपंच यांना वारंवार सांगून सुद्धा लाईट बसण्यात आले नाही.
(ads)
त्या मुळे नागरिक ग्रामपंचायतिच्या कारभारावर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे. गणेश उत्सवा सारखा सन असताना देखील संपूर्ण गावात पथदिवे बंद अवस्थेत होते व अजून देखील ते त्याचा परिस्थीत आहे.गाव मध्ये चोरीच्या घटना वाढण्याचा शक्यता नाकारता येणार नाही.अंधार असल्यामुळे नागरिक बाहेर पडायला सुद्धा भीती वाटते. एखादी मोठ्या घटना घडण्यास ग्रामपंचायत जबाबदारी स्वीकारा का? अस प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण होत आहे.सबंधित ग्रामपंचायतीने लवकरात लवकर पथदिवे बसवून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी नागरिकांन कडून होत आहे.



