सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय ऐनपुर येथे राष्ट्रीय सेवा योजना एकका अंतर्गत व मराठी विभागाअंतर्गत सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त देशभक्तीपर गीत गायनाचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात बहुसंख्य विद्यार्थी हजर होते. वैयक्तिक आणि सामुहिक देशभक्तीपर गीत गायनातून विद्यार्थ्यांनी आनंद मिळविला.
(ads)
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. रेखा प्रमोद पाटील ह्या होत्या. ' लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचे राष्ट्रीय एकात्मतेमध्ये योगदान' या विषयावर त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
देशभक्तीची प्रेरणा, राष्ट्रीयत्वाची भावना ही देशभक्तीपर गीत गायनातून निर्माण होत असते. कु. काजल युवराज कोळी आणि कु. कोमल ज्ञानेश्वर धामोडकर या विद्यार्थिनींनी वैयक्तिक गीत गायन केले. कु. जानवी महाजन, कु. हिमानी गुप्ता, कु. कोमल धामोडकर, कु. काजल कोळी, कु. योगिता गोराडकर आणि सहकारी विद्यार्थीनीनी समूहगीत गायनातून देशभक्तीचा आनंद लुटला.
(ads)
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तृतीय वर्ष विज्ञान शाखेचा विद्यार्थी रा. से. यो. विद्यार्थी प्रतिनिधी अनुराग धनगर याने केले. सर्व उपस्थितांचे आभार कु. दिव्या केळकर हिने मानले. सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने व प्रा. व्ही.एन.रामटेके मुख्य कार्यक्रम अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. त्याचप्रमाणे प्रा. डॉ. महेंद्र सोनवणे आणि प्रा. एस. पी. उमरीवाड यांचे सहकार्य लाभले.



