यावल पूर्व व पश्चिम वनक्षेत्रपालाच्या हद्दीतून दररोज ट्रक भरून लाकडाची वाहतूक : यावल वन विभाग उपवनसंरक्षक यांचे दुर्लक्ष

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


यावल ( सुरेश पाटील ) जळगाव येथील यावल वन विभाग कार्यक्षेत्रातील यावल येथील यावल पूर्व व पश्चिम वनक्षेत्रपाल यांच्या कार्यालयापासून एक किलोमीटर अंतरावरून दररोज सागवान व 

आडजात लाकडाचे ट्रक भरून ताडपत्रीने झाकून परराज्यात व जिल्ह्यात रवाना होत असतात याकडे उपवनसंरक्षक यांनी लक्ष केंद्रित करून कारवाई करावी अशी मागणी होत आहे. 

(ads)

यावल पूर्व व पश्चिम वनक्षेत्रपाल यांचे कार्यक्षेत्रातून म्हणजे सातपुडा जंगलातून सागवान व आडजात लाकडाची वृक्षतोड सर्रासपणे होत असून बेकायदा वाहतूक ट्रक व लहान चार चाकी वाहनातून सर्रासपणे सुरू आहे. ही ही सागवानी लाकडाची अवैध बेकायदा वाहतूक करताना संबंधित वाहनात लाकूड भरून नेताना वरतून ताडपत्रीने झाकून अवैध लाकडाची वाहतूक करतात ही वाहतूक करताना ठिकठिकाणीच्या वजन काट्यावर वाहनासह लाकडाचे वजन वजन करून पर राज्यात व जिल्ह्यात दिवसा आणि रात्री बिंदासपणे सुरू आहे. 

(ads)

एक ट्रक भरून आडजात लाकूड वाहतुक करण्यासाठी दर निश्चित करण्यात आले आहेत.यात एका ट्रक साठी रेंजरच्या नावाने २ हजार,नाके कारकुन १ हजार, आणि फिरते पथकाच्या नावाने १ हजार व इतर दुसरा खर्च धरून एक ट्रक भरून वाहतूक करण्याचा खर्च ३० हजार येत असतो.आणि हा ट्रक बाजारात परराज्यात ६० रुपयाचा विक्री होत असतो म्हणजे एका ट्रक मध्ये तीस हजार रुपये नफा मिळतो अशी चर्चा यावल रावेर तालुक्यात आहे. याकडे जळगाव येथील यावल वन विभाग उपवनसंरक्षक यांनी आपले लक्ष केंद्रित करून कारवाई करावी अशी मागणी होत आहे.याचप्रमाणे काही ठराविक स्वामील चालक अवैध सागवानी लाकडाची कटाई करून वन विभागाच्या नावाने फर्निचर दुकानदारांकडून मासिक हप्ते गोळा करीत असल्याची चर्चा सुद्धा आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!