ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात तहसील कार्यालय रावेर यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र शासनच्या सेवा पंधरवाड्यानिमित्त विविध प्रमाणपत्र बाबत शिबिर मा प्राचार्य डॉ जे बी अंजने यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन उप प्राचार्य डॉ एस एन वैष्णव यांनी केले.
(ads)
या शिबिरात जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, रहिवास दाखला, वय व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र इ बाबत माहिती दिली. या शिबिरासाठी रावेर तहसील कार्यालय चे श्री गणेश बारी यांनी आवश्यक त्या कागदपत्रे ची माहिती दिली. व विद्यार्थांना तशी प्रमाणपत्रे तत्काळ उपलब्ध करून दिली.
(ads)
या शिबिरासाठी श्री ऋषिकेश महाजन प्रा मिलिंद भोपे, प्रा कोमल सुतार, प्रा. वैष्णवी डी पाटील, प्रा वैष्णवी पाटील, प्रा हेमंत बाविस्कर, प्रा संदीप साळुंके प्रा व्हि. एच पाटील, डॉ जे पी नेहेते, प्रा एस बी महाजन तसेच हर्षल पाटील, श्री श्रेयस पाटील यांनी मेहनत घेतली व सहकार्य केले



