केळी भरणाऱ्या ट्रक उलटल्याने हिंगोणा आणि रोझोदा येथील तेरा केळी कामगार जखमी
सावदा (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : सविस्तर वृत्त असे की दिनांक 2 नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास सावदा येथून जामनेर कडे केळी भरण्यासाठी जात असलेल्या ट्रकचा अपघात झाला या अपघातात रोझोदा आणि हिंगोणा येथील तब्बल 13 केळी कामगार मजूर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे मिळालेल्या माहितीनुसार ट्रक केळी भरण्यासाठी जामनेर कडे जात असताना हा अपघात आमोदा गावाच्या हद्दीत घडला अचानकपाने ट्रकचे नियंत्रण सुटल्याने तो उलटला.
(ads)
अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती जखमी केळी कामगार मजुरांना गावातील ग्रामस्थांनी तत्काळ धाव घेऊन जखमींना मदत केली व रुग्णवाहिकेद्वारे त्यांना तातडीने फैजपूर येथील डॉक्टर खाचणे यांच्या एक्सीडेंट हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींवर उपचार सुरू आहे.



