रावेर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी भाजपाच्या संगीता भास्कर महाजन विजयी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

रावेर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी भाजपाच्या संगीता भास्कर महाजन विराजमान


 रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : रावेर येथील नगरपालिकेच्या अटीतटीच्या व चूरशीच्या झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज  दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी तहसील कार्यालयात करण्यात आली. नगराध्यक्ष पदाचे शिवसेना ( उबाठा) पक्षाचे उमेदवार मनीषा रवींद्र पवार यांचा पराभव करीत रावेर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी भाजपच्या संगीता भास्कर महाजन या विजयी झाल्या आहेत. रावेर नगर पालिकेच्या 23 नगरसेवक पदासाठी 2 डिसेंबर रोजी मतदान झाले होते. भाजपची प्रभाग 2 मधील एक जागा आधीच बिनविरोध झाली होती. पक्ष चिन्हावर लढलेल्या भाजपला 9 जागा मिळाल्या असून राष्ट्रवादी अजित पवार गटाला 10, काँग्रेसला 2 तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला 1 जागा मिळाल्या आहेत. 2 जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. संगीता महाजन यांच्या विजयामुळे रावेर नगरपालिकेवर भाजपने झेंडा रोवला आहे. 

(ads)

आज सकाळी दहा वाजता रावेर तहसील कार्यालयात प्रशिक्षणार्थी उप जिल्हाधिकारी दीपा जेधे, निवडणूक निर्णय अधिकारी तथा रावेर तहसीलदार बंडू कापसे, निवासी नायब तहसीलदार संजय तायडे, सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा प्रभारी मुख्याधिकारी सतीश पुदाके यांच्या उपस्थितीत मतमोजणीला सुरुवात झाली. सहा टेबलवर सात फेऱ्याद्वारे मतमोजणी करण्यात आली. 

(ads)

 यांना 14093 मते मिळाली असून प्रतिस्पर्धी शिवसेनेच्या (उबाठा )उमेदवार मनीषा रवींद्र पवार यांच्या पेक्षा त्यांना 6475 मते अधिक मिळाली आहेत. मनीषा पवार यांना 7618 मते मिळाली आहेत.

विजयी झालेले प्रभाग निहाय उमेदवार पुढीलप्रमाणे : 

प्रभाग 1 :


नितीन भगवान महाजन अपक्ष(1584)


सपना योगेश महाजन भाजप (1515)


प्रभाग 2 :


राजेश सुधाकर शिंदे भाजप( 1383)


जयश्री नितीन महाजन भाजप (बिनविरोध)


प्रभाग 3 :


अरुण दत्तात्रय आस्वार भाजप (1061)


योगिता भूषण महाजन भाजप(1457)


प्रभाग 4 :


अर्चना योगेश पाटील भाजप (1411)


गणेश प्रभाकर पाटील भाजप (1382)

(ads)

प्रभाग 5 :


नरेंद्र विश्वनाथ वाघ राष्ट्रवादी(722)


सालेहा कौसर अल्ताफ खान राष्ट्रवादी(900)


प्रभाग 6 :


सुमय्या बी जाविद राष्ट्रवादी(2268)


आसिफ मोहम्मद दारा मोहंमद राष्ट्रवादी(2118)


प्रभाग 7 :


सानिया परवीन शेख साऊद राष्ट्रवादी(769)


मोहम्मदसमी मोहम्मद आसिफ राष्ट्रवादी(822)

(ads)

प्रभाग 8 :


रुबीनाबी इरफान शेख राष्ट्रवादी(731)


शेख सादिक अब्दुल नबी राष्ट्रवादी(831)


प्रभाग 9 :


शाहीन परवीन सफदार काँग्रेस(848)


दारा मोहंमद जाफर मोहंमद राष्ट्रवादी(753)


प्रभाग 10 :


अनिता मुरलीधर तायडे काँग्रेस(522)


गोपाळ रत्नाकर बिरपण राष्ट्रवादी(642)


प्रभाग 11 :


सीमा आरिफ जमादार भाजप(547)


गणेश सोपान पाटील राष्ट्रवादी श. पवार(622)


प्रभाग 12 :


प्रमिला चुडामन पाटील अपक्ष(1062)


राजेंद्र पंढरीनाथ चौधरी भाजप(1348)

कोण्या उमेदवाराने किती मते घेतली 

पहा एका क्लिक वर


बूथ नुसार झालेले मतदान पाहण्यासाठी

 (येथे क्लिक करा)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!