संपादकीय विशेष लेख : वंचित बहुजन आघाडी ' निवडणूक जिंकू शकते

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


काल महाराष्ट्र राज्यातील २८८ नगरपंचायती आणि नगरपरिषद निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. या निकालातील ' वंचित बहुजन आघाडी ' चे यश दुर्लक्षित करून चालणार नाही. ' वंचित ' ने बार्शी टाकळी ( अकोला ) आणि चांदूर रेल्वे ( अमरावती ) या दोन ठिकाणी नगराध्यक्ष निवडून आणले आहेत,तर राज्यात तब्बल ६० हून अधिक नगरसेवक निवडून आणून आपली ताकद दाखविली आहे. निवडून येणारे नगरसेवक केवळ अकोला जिल्ह्यातील नाहीत हे या निवडणुकीचे वैशिष्टय आहे. नागपूर,चंद्रपूर, अहील्यानगर, नांदेड,अमरावती,बुलढाणा,पुणे यासारख्या जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात नगरसेवक निवडून आलेले आहेत. आणि ते वेगवेगळ्या जात समूह आणि वंचित घटकांचे आहेत.हे विशेष.


लोकसभा,विधानसभा निवडणुकीच्या अपयशावरून वंचितला लक्ष करणाऱ्यांना ' हे यश नजरेआड करता येणार नाही.


बाळासाहेब आंबेडकर यांनी २०१९ साली स्थापन केलेल्या 'वंचित ' ला गेल्या दोन मोठ्या निवडणूका पाहता यश मिळालं नव्हतं, या निवडणुकीतून मात्र वंचित स्वबळावर जिंकू शकते, हा संदेश आंबेडकरी समूहात गेला आहे.अलीकडे आपला राजकारणात टिकाव लागत नाही,या विचारानं आंबेडकरी समाज अस्वस्थ होता. या निकालाने केवळ ही अस्वस्थता दूर होईल, असं नाही,तर पुढच्या होऊ घातलेल्या महापालिका,जिल्हा परिषदा,पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतही आपला पक्ष जिंकू शकतो,हा आशावाद जागा व्हायला मदत होईल.


लोकशाहीत प्रत्येक निवडणूक महत्वाची असते. ती ग्रामपंचायतीची असो,की विधानसभा,लोकसभेची. हे बाळासाहेब आंबेडकर सुरवातीपासून ओळखून आहेत म्हणून ते राजकारणात टिकून आहेत. अगदी भारिप पासून बहुजन महासंघा पर्यंत ते आताच्या वंचित बहुजन आघाडी पर्यंत त्यांनी प्रत्येक निवडणूकीत आपल्या पक्षाचे उमेदवार दिले आहेत.अकोला पॅटर्न त्यातूनच नावारूपाला आलेला आहे. अकोला पॅटर्नने यापूर्वी आमदार,खासदार, महापौर,नगरसेवक,जिल्हा परिषद अधक्ष, सदस्य,पंचायत समिती सभापती, सदस्य,सरपंच, ग्रामपंचायतीचे सदस्य निवडून आणलेले आहेच.


प्रस्थापित राजकीय पक्षाशी एक दोन जागेच्या समझोत्याच्या आणि एक जातीय राजकारणाच्या पलीकडचे राजकारण म्हणून बाळासाहेब आंबेडकर यांच्या राजकारणाकडे पाहिले जाते.


काँग्रेस किंवा अन्य पक्षांच्या वळचणीला जाऊन राजकारण करणारे नेते आणि त्यांचे कार्यकर्ते, काँग्रेस बरोबर समझोता करून निवडणूका लढवा,अशी मानसिकता असणारे तथाकथित विचारवंत,लेखक,कवी,कलावंत यांच्या नजरेतून अलीकडचा निकाल कदाचित सुटेलही ; मात्र जो समूह फुले,शाहू, आंबेडकर यांच्या विचारांवर श्रद्धा ठेवतो त्यांच्या नजरेतून हा निकाल सुटू शकत नाही.


वंचित बहुजन आघाडी जिंकू शकते...!

-दीपध्वज कोसोदे

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!