रावेर तालुक्यातील खिर्डी येथील मिलिंद जाधवची MPSC परीक्षेत भरारी : पोलीस उपनिरीक्षक पदी निवड

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 

रावेर तालुक्यातील खिर्डी येथील मिलिंद जाधवची MPSC परीक्षेत भरारी : पोलीस उपनिरीक्षक पदी निवड

रावेर तालुका प्रतिनिधी (जमील शेख) 

रावेर तालुक्यातील खिर्डी बु! येथील रहिवाशी सेवानिवृत्त लोको चीफ रेल्वे ड्रायव्हर सुनील जाधव यांचे चिरंजीव आयु. मिलिंद सुनील जाधव यांनी लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात घवघवीत यश संपादन केले.व पोलीस उपनिरीक्षक पदावर मिलिंद जाधव यांची पहिल्याच प्रयत्नात निवड झाली.

(ads)

जिद्द व चिकाटी असेल तर परिस्थीती वर मात करता येते मिलिंद याने इच्छाशक्तीला पूर्ण स्वरूप मिळवून दिले हे विशेष उल्लेखनीय आहे.त्याचे यश हे निश्चितच इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा दायी आहे.त्याबद्दल सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहेत.

(ads)

 मिलिंद जाधव यांनी पुण्यातील एस .पी .कॉलेजमधून राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली असून त्यांना रयत प्रबोधिनी या कोचिंग क्लासचे मार्गदर्शन लाभले. तसेच पुणे विद्यापीठातील प्रा. डॉ. मनोहर जाधव आणि बॉम्बे क्राईम ब्रँच चे चंद्रकांत जाधव यांचे मिलिंद जाधव हे पुतणे आहेत.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!