ऐनपूर: येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयातील रसायनशास्त्र मंडळ तर्फे राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने उपस्थित होते. प्रा. डॉ. पी. आर. महाजन हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. सुरुवातीला डॉ. जे. पी. नेहेते यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रा. पी. आर. महाजन यांनी आपल्या मार्गदर्शनपर व्याख्यानामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवसाचे महत्व समजावून सांगितले. भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सीव्ही रमण यांनी रमन इफेक्टचा शोध लावल्याच्या स्मरणार्थ २८ फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून भारतभर पाळला जातो. विज्ञानाची गोडी लावून नवीन संशोधनाची निर्मिती करणे, नवीन संशोधन उदयास येणे हा त्यामागील मुख्य उद्देश आहे असे सांगितले. डॉ. एस. एन. वैष्णव यांनी मार्गदर्शनपर व्याख्यानामध्ये सी. व्ही. रामन यांच्या शोधाचे महत्त्व आणि त्यांच्या योगदानाचे बद्दल सांगितले. त्यांच्या 'रामन प्रभाव'च्या शोधामुळे भारताला एक वैज्ञानिक शक्ती म्हणून ओळख मिळाली. त्यांच्या शोधाचे स्मरण करून नवीन काही तरी निर्माण करण्याची क्षमता विद्यार्थ्यामध्ये निर्माण व्हावी, त्यासाठी विज्ञान दिवस साजरा केला जातो तसेच विद्यार्थ्यांच्या विविध शंकांचे निरसन केले. विज्ञान शाप की वरदान याबद्दल विद्यार्थ्यांशी चर्चा केली. विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवून जिद्द व चिकाटी ने प्रयत्न करून तुमचे ध्येय तूम्ही गाठू शकाल तसेच हा दिवस आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनात विज्ञानाचे महत्त्व समजून घेण्याची आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याची आठवण करून देतो असे मत अध्यक्षीय समारोपात मा. प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांनी मांडले. कार्यक्रमानंतर राष्ट्रीय विज्ञान दिना निमित्त सामान्य विज्ञान या विषयावर परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. जे. पी. नेहेते तर आभार प्रदर्शन प्रा. एस. एस. साळुंके यांनी केले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थी, प्राध्यापक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारीयांनी परिश्रम घेतले.




