मागील काही दिवसांपासून मोबाईलचे अचानक नेटवर्क जाणे, कॉल सरू असतांना अचानक कट होणे, या समस्येमुळे ऑनलाईन व्यवहार ठप्प होऊन ग्रामस्थांचे हाल होत असल्याने मोबाईल टॉवर असून अडचण नसून खोळंबा अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे 'मोबाईल टॉवर नावाला अन रेंज नाही गावाला' अशी म्हणण्याची वेळ आली आहे.
(ads)
गावात व परिसरातील गावात बीएसएनएल कंपनीचे टॉवर आहेत. मात्र ही टॉवर असून नसल्यासारखी परिस्थिती झाल्याने मोबाईलधारकांना रेंजच येत नसल्यामुळे कोणतेही ऑनलाईन व्यवहार करता येत नाहीत. गेल्या काही दिवसांपासून तर मोबाइलचे अचानक नेटवर्क जाणे, फोन सुरू असताना अचानक कट होणे. फोर-जी सेवा असली तरी टू-जीची सेवा मिळणे, वापर कमी बिलच जास्त येणे, शेजारी शेजारी फोन असताना फोन न लागणे अशा अनेक कारणांमुळे सर्वच अभिषेक खराडे मोबाइलधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. यामध्ये बीएसएनल या सरकारी कंपनीचे अपवाद नाही. सध्याच्या काळात मोबाइलशिवाय जगणे कठीण बनले आहे.
हेही वाचा : "या" लोकांचे होणार रेशनकार्ड कायमचं बंद, 1 एप्रिलपासून नियमांत मोठा बदल
नागरिक त्यांच्या सोईनुसार विविध मोबाइल कंपन्यांची सीमकार्ड वापरतात. मात्र, अलिकडे मोबाइल कंपन्यांच्या सदोष सेवेमुळे सर्वच कंपन्यांचे ग्राहक त्रस्त झाले आहेत प्रत्येक मोबाइल कंपनीच्या ग्राहकाला विचारल्यानंतर काहींना काही तक्रार असल्याचे आढळून आले आहे. परिसरातील अनेकांशी संपर्क साधल्यानंतर मोबाइल कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या सेवांचा नागरिकांनी पाढाच वाचून दाखविला. बीएसएनएल या कंपनीचे सीमकार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना तर सर्वाधिक त्रास होत असल्याचे आढळून आले. याचा सर्वाधिक फटका व्यावसायिकांना बसत आहे
(ads)
*प्रतिक्रिया*
मोबाईलवर पैसे लवकर ट्रान्सफर न होणे, इंटरनेट स्पीड कमी असणे. दुसऱ्या व्यक्तीला नंबर अस्तित्वात नसल्याचे सांगणे, असा त्रास सातत्याने होत असतो.
*विज गेल्यास नेटवर्क नाही*
परिसरातील अनेक गावात कोणत्याच मोबाइल कंपनीची पुरेशी रेंज नसल्याने सिमकार्ड कोणत्या कंपनीचे वापरावे, असा प्रश्न नागरीकांना पडला आहे. गावातील विज गूल होताच मोबाइलचे नेटवर्कही गायब होते. त्यामुळे प्रत्येक टॉवरला स्वतंत्र ट्रान्स्फॉर्मर अथवा जनरेटरची व्यवस्था करावी अशी मागणी होत आहे.
(ads)
*प्रतिक्रिया*
गेल्या काही महिन्यांपासून रेंज जाण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे कामाच्या वेळात खूप त्रास होतो. त्यामुळे सोबत दुसऱ्या कंपनीचे एक कार्ड वापरतो. कधी कधी फोन न लागणे, इंटरनेटला स्पीड कमी असणे किंवा मध्येच इंटरनेट बंद होणे, असे प्रकार वारंवार घडत आहे



