जळगाव (सुवर्ण दिप वृत्तसेवा) - प्रजाशक्ती क्रांती दलाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष गहिनीनाथ वाघ यांनी आजपासून प्रादेशिक परिवहन कार्यालय जळगाव येथे आमरण उपोषण सुरु केले आहे. त्यांनी परिवहन विभागातील भ्रष्टाचार, प्रशासकीय निष्क्रियता व नैतिक जबाबदारीचा मुद्दा उठवत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा नैतिक राजीनामा, MPSC चे अध्यक्ष विवेक भीमनवार यांची निवड रद्द करणे, तसेच भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तात्काळ फौजदारी व विभागीय कारवाई करण्यास मागणी केली आहे.
(ads)
उपोषण कर्त्याच्या मागण्या विस्तृत असून, त्यात स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी समिती नेमणे, बेकायदेशीर वसुली थांबवणे, चाचणी व कार्यालयीन कार्यवाहीचे चित्रफित करून पारदर्शकता सुनिश्चित करणे, करकी चेकपोस्ट कायमस्वरूपी बंद करणे, तसेच दोषी अधिकारी व कर्मचारी तात्काळ बडतर्फी करण्यासह कायदेशीर कार्यवाही करणे यांचा समावेश आहे.
गहिनीनाथ वाघ म्हणाले, श्रमिकांच्या न्याय हक्कासाठी ही लढाई अशीच सुरु राहील. प्रशासनाने मंडप व स्टेजची व्यवस्था नाकारली तरी आंदोलन ठाम राहणार आहे.
(ads)
उपोषणकर्त्यांच्या कोण कोणत्या आहे मागण्या:
१) परिवहन विभागातील भ्रष्टाचार, प्रशासकीय निष्क्रियता व नैतिक जबाबदारी म्हणून परिवहन मंत्री श्री. प्रताप सरनाईक यांचा नैतिकदृष्ट्या राजीनामा घेणे
२) भ्रष्ट अधिकार-याना पाठीशी घालणारे तत्कालीन परिवहन आयुक्त श्री. विवेक भिवनवार यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष पदी झालेली निवड रद्द होणे.
३) प्रादेशिक परिवहन विभाग जळगांव येथील संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यांवर तात्काळ फौजदारी व विभागीय कार्यवाही होणेबात.
४) संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी होणेसाठी निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमावी.
५) बेकायदेशर वसुली पुर्ण थांबवणे बाबत..
६) दिनांक - ३१-०१-२०२३ पासून दि. २४/०३/२०२५ पर्यंत सदर कर्की ता. मुक्ताईनगर चेक पोस्ट वर कर्तव्यास असलेले अधिकारी, कर्मचारी व संबधीत वरिष्ठ अधिकारी व त्यांच्या जवळच्या नातेवाईकांची संपत्तीची चौकशी करून दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांना सेवेतून त्वरीत बडतर्फ करून त्यांच्या विरुध्द कायदेशीर कार्यवाही करणे बाबत.
(ads)
७) सदर कर्की चेक पोस्ट त्वरीत कायमस्वरूपी बंद करणे बाबत.
८) उपोषनकर्त्यांची पत्राद्वारे दिशाभूल करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करणारे सहाय्यक प्रादेशिक परिवहन
अधिकारी श्री. सचिन बुरुड यांच्या विरुद्ध विशेष चौकशी समिती नेमुन त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कार्यवाही होणेबाबत
९) पुराव्यानिशी तक्रार दिलेले मोटार वाहन निरीक्षक श्री. नितीन सांवत व मोटार वाहन निरीक्षक श्री. सुरेंद्र चौरे यांच्या विरुद्व तात्काळ बडतर्फीची कार्यवाही होणेबाब
१०) चाचणी मैदानावरील काही सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक तसेच काही मोटार वाहन निरीक्षक हे खाजगी लोकांच्या माध्यमातून चाचणी पास करण्यासाठी अवैध पणे पैसे घेतात त्यांच्या विरुद्व चौकशी होऊन तात्काळ बडतर्फीची कार्यवाही करणे.
(ads)
११) प्रादेशिक परिवहन कार्यालयात असलेले इन्सपेक्टर रुम जवळ काही सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक तसेच काही मोटार वाहन निरीक्षक हे खाजगी लोकांच्या माध्यमातून कामे करुन देण्यांसाठी अवैध पणे पैसे घेतात त्यांच्या विरुद्व चौकशी होऊन तात्काळ बड़तर्फीची कार्यवाही होणेबाबत
१२) वायुवेग पथकांच्या गाड्याना (फलाईग स्काड) रुफ माऊटेड कॅमेरे लावुन वायुवेग पथकाची प्रत्येक दिवसाची संपूर्ण कार्यवाही ही लोकहिताच्या दृष्टीने शासकीय कामातील पारदर्शकता म्हणुन चित्रीफित स्वरुपात जतन करणे बाबत.
१३) इन्सपेक्टर रुम मधील व बाहेरील कार्यवाही ही संपूर्णपणे चित्रीत करुण लोकहिताच्या दृष्टीने शासकीय कामातील पारदर्शकता म्हणुन चित्रीफित स्वरुपात जतन करणे बाबत.
(ads)
१४) मोहाडी परिसरात असलेले प्रादेशिक परिवहन विभागाचे चाचणी मैदान येथिल कार्यालयात व कार्यालया बाहेर तसेच चाचणी दरम्यान होणारी कार्यवाही ही चित्रीत करुन लोकहिताच्या दृष्टीने शासकीय कामातील पारदर्शकता असणे कामी चित्रफित स्वरुपात जतन करणे बाबत.
१५) करकी येथिल असलेल्या सिमा तपासणी नाक्यावर तपासणी मार्गीकेतुन जाणा-या प्रत्येक वाहनाचे चित्रीकरण व्हावे तसेच सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक तसेच मोटार वाहन निरीक्षक हे दोषी वाहनावर करीत असलेल्या कार्यवाहीचे चित्रीकरण होऊन ते चित्रीकरण लोकहिताच्या दृष्टीने शासकीय कामातील पारदर्शकता असणे कामी चित्रफित स्वरुपात जतन करणे बाबत.
(ads)
१६) करकी येथिल असलेल्या सिमा तपासणी नाक्यावर तपासणी मार्गीकेतुन जाणा-या प्रत्येक वाहनाचे चित्रीकरण
व्हावे तसेच सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक तसेच मोटार वाहन निरीक्षक हे दोषी वाहनावर करीत असलेल्या कार्यवाहीचे चित्रीकरण होऊन ते चित्रीकरण लोकहिताच्या दृष्टीने शासकीय कामातील पारदर्शकता असणे कामी चित्रफित स्वरुपात जतन करणे बाबत




