अमली पदार्थ विरोधात जळगावात मोठी कारवाई ; 21 लाखांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


 जळगाव(सुवर्ण दिप वृत्तसेवा) :

 अमली पदार्थ विरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत 21 लाखांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जळगावात अमली पदार्थाच्या विरोधात मोठी कारवाई केली आहे. जळगाव जिल्ह्यात अवैध गुटखा तस्करीविरोधात अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली आहे. या कारवाईत 21 लाख 81 हजार 600 रुपयांचा अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. संशयित वाहनाचा दोन दिवस पाठलाग करून ही कडक कारवाई करण्यात आली आहे, त्यामुळे जिल्ह्यातील अमली पदार्थ तस्करांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

(ads)

 या कारवाईत गुटख्याने भरलेली पिकअप व्हॅन जप्त करण्यात आली आहे. वाहन चालकाला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी जळगाव औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता या संपूर्ण रॅकेटमागील मुख्य सूत्रधाराचा पोलिस शोध घेत आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांविरोधात कडक कारवाई केली आहे. जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गुटख्याची वाहतूक होत असल्याची खात्रीशीर गुप्त माहिती अन्न सुरक्षा विभागाला मिळाली होती. 

(ads)

 यानंतर अन्न सुरक्षा अधिकारी आरा खालकर यांना वरिष्ठ स्तरावरून सूचना मिळताच विशेष पथक तयार करण्यात आले. संशयित वाहनावर नजर ठेवण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने नियोजनबद्ध पद्धतीने शोध मोहीम सुरू केली. मुक्ताईनगरमार्गे जळगावमध्ये येणाऱे वाहन संशयित पिकअप व्हॅन जळगाव जिल्ह्यात पोहोचण्याआधीच त्याचा मागोवा घेण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाचे कर्मचारी हजर होते. संशयित वाहन पुढे गेल्यानंतर अधिकाऱ्यांनी त्याचा पाठलाग सुरू केला. आणि जळगाव पोलिसांना माहिती देण्यात आली.

(ads)

 यानंतर जळगाव औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक चंद्रकांत धनके आणि त्यांच्या पथकाने रिलायन्स पेट्रोल पंपासमोर सापळा रचून संबंधित पिकअप व्हॅन पकडली. पिकअप वाहनाची कसून तपासणी केली असता, त्यामध्ये गुटख्याच्या 58 गोण्या सापडल्या आहेत. अधिकाऱ्यांनी बाजारभावानुसार या गुटख्याची किंमत 21 लाख 81 हजार 600 रुपये असल्याचे सांगितले आहे. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, हा गुटखा जळगाव जिल्ह्यातील विविध भागांत विक्रीसाठी आणला जात होता.

 (ads)

त्यामुळे आता या जिल्ह्यातील अवैध व्यवसायामागील मुख्य सूत्रधार, माल पुरवठादार आणि वितरण नेटवर्कचा शोध घेण्यासाठी पोलिस आणि अन्न सुरक्षा विभागाने संयुक्त तपास सुरू केला आहे. कारवाईत जप्त करण्यात आलेला गुटखा आणि वाहन प्रशासनाने जप्त केले आहे. अटक करण्यात आलेल्या चालकाची चौकशी सुरू आहे.

(ads)

 राज्यात गुटखा विक्रीवर राज्यात बंदी असतानाही शाळा, महाविद्यालय परिसर, बसस्थानके आणि रेल्वे स्टेशन परिसरात राजरोसपणे विक्री होत असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने अवैध गुटखा विक्री आणि वाहतुकीविरोधात राज्यभरात आणखी कठोर कारवाया करण्याचा इशारा दिला आहे. या मोठ्या कारवाईनंतर जळगावातील गुटखा तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणात अधिक तपास जळगाव पोलिस कत आहेत.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!