पतीने स्वतःच्या ३ वर्षाच्या अंध ( मुलाचा ) व सासूने नातवाचा खून केला म्हणून खुनाचा गुन्हा दाखल; यावल तालुक्यातील घटना

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


पतीचे इच्छेविरुद्ध अंध मुलास जन्मास घातल्याचे कारण. 

यावल  ( सुरेश पाटील )

पतीचे इच्छेविरुद्ध अंध मुलास जन्मास घातले याचा राग सतत मनात ठेवून सासूने आणि फिर्यादीच्या पतीने तीन वर्षाच्या मुलाच्या अंधत्वास कंटाळून मुलाचा खून केल्याच्या कारणावरून यावल पोलीस स्टेशनला मयत मुलाच्या आईने फिर्याद दिल्याने खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

(ads)

यावल पोलिसांनी दिलेली माहिती अशी की सौ.सरस्वती स्वप्नील पाटील वय २६ रा. राजे संभाजी चौक किनगाव या महिलेने फिर्याद दिली की पती स्वप्नील भागवत पाटील वय ३२, सौ.आशाबाई भागवत पाटील वय ६० रा. राजे संभाजी चौक किनगाव पाटील वाडा.ह.मु.त्रिमूर्ती चौक कामठवाडी रोड सप्तशृंगी मंदिराजवळ नाशिक. यांनी सोमवार दि.१३ जुलै २०२६ रोजी २ वाजून ४८ मिनिट वाजेच्या दरम्यान किनगाव शिवारात जळगाव रोड जवळ असलेल्या मालकीच्या शेतातील विहिरीत वृंदावन येथून आणलेले पवित्र पाणी टाकण्यासाठी यातील फिर्यादी व तिचा पती स्वप्नील व सासू आशाबाई यांनी घरापासून पायी चालत व ३ वर्षाचा अंध मुलगा कृष्णा यास कडेवर घेऊन गेलेले असताना विहिरीचे जवळपास कोणी नाही याचा अंदाज घेऊन सासू आशाबाई पाटील व पती स्वप्नील पाटील यांनी संगणमत करून पतीचे इच्छेविरुद्ध अंदमलास जन्मास घातले याचा राग सतत मनात ठेवून तिचे तसेच तिचा मुलगा कृष्णा याचे अंधत्ववास कंटाळून फिर्यादीस जीवे मारण्याचे उद्देशाने फिर्यादीची सासू आशाबाईने फिर्यादीला व तिचा मुलगा कृष्णा याच धक्का मारून विहिरीत ढकलून दिले असता फिर्यादीने स्वतःला वाचविले.

(ads)

 परंतु तिचा मुलगा कृष्णा स्वप्निल पाटील वय ३ वर्ष याचा विहिरीत पडून पाण्यात बुडून मृत्यू झाला असून फिर्यादीचे पतीने व सासूने मुलाचा संगमने खून केला या कारणावरून यावल पोलीस स्टेशनला गुन्हा र. नं. २५४ / २०२६ भा.न्या.सं.कलम १०३ ( १ ),१०९ ( १ ), ३ ( ५ ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला घटनेचे वृत्त कळता बरोबर उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांनी भेट दिली त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल महाजन यांच्याकडे दिला.

(ads)

अंधत्व मुख्य कारण - या प्रकरणातील मयत ३ वर्षाचा मुलगा कृष्णा स्वप्नील पाटील हा अंध होता.याचे वडील तथा आरोपी म्हणून स्वप्निल भागवत पाटील नाशिक येथे एका बँकेत नोकरीवर असलेला हा सुद्धा अंध आहे. तसेच तीन वर्षाच्या मयत मुलाची आई सुद्धा अंध आहे. यांच्या अंधत्वाला कंटाळून सदरची घटना घडल्याची किनगावात चर्चा आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!