रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : दिल्ली येथिल जंतर मंतर मैदान येथे दि. 20 जुलै रोजी नीट पेपर फुटी प्रकरणी केंद्रिय मंत्री श्री. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागणी साठी देशभरातील विद्यार्थ्यांनी लोकशाहीचा मार्गाने सुरु केलेल्या आंदोलनात सहभागी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींवर दिल्ली पोलिसांनी अमानुषपणे लाठीचार्ज करून जखमी केले आणि आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला हे कृत्य लोकशाही विरोधी असुन संविधानात्मक हक्काचे हनन आहे. त्याचा रावेर वकिलांनी आज रावेर तहसीलदार सौ. दीपा जेधे व नायब तहसीलदार श्री. संजय तायडे यांना निवेदन देऊन निषेध व्यक्त केला आणि दिल्लीत सुरु असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला पाठींबा दर्शविला तसेच दिल्ली पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
(ads)
यावेळी ऍड. व्ही. पी.महाजन, ऍड. जिजाबराव पाटील, ऍड. धनराज ई. पाटील, ऍड. के. बी. खान, ऍड. योगेश गजरे, ऍड. सुभाष धुंदले ऍड. जितेंद दांडगे, ऍड. दिपक एच. गाढे, ऍड. आर. ए. पाटील,ऍड. दिपक तायडे, ऍड. संदीप मेढे, ऍड. प्रदीप लहासे,ऍड. सतिष मोरे, ऍड. शिवदास कोचुरे,ऍड. समशेर सैय्यद अली आदी वकील सदस्य उपस्थित होते तर निवेदनावर ऍड. विपीन गडे, ऍड. राकेश पाटील,ऍड. धीरज पाटील, ऍड. सतिष वाघोदे,ऍड. अमोल नाईक, ऍड.प्रमोद पाटील, ऍड. विनोद कोंघे, ऍड. अमोल कोंघे, ऍड. मोहन कोचुरे यांच्या सह्या आहेत.


