रावेर येथे फुले-शाहू-आंबेडकर सार्वजनिक वाचनालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 

रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) :

रावेर येथील फुले-शाहू-आंबेडकर सार्वजनिक वाचनालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे यांच्या सामाजिक, साहित्यिक आणि क्रांतिकारी कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचे स्मरण केले.

    (ads)

 कार्यक्रमास ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रघुनाथ कोंघे, बाळू शिरतुरे, अशोक शिंदे, संघरत्न दामोदरे, प्रदीप सपकाळे, धनराज घेटे, सुधीर सैंगमिरे, संकेत तायडे, बाळू तायडे, शुभम घेटे, रोहन तायडे, अंकित तायडे, जितेंद्र साबळे, पत्रकार अन्वरभाई तसेच जितेंद्र ढिवरे यांच्यासह वाचनालयाचे सभासद व सहवाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  (ads)

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदर्शन फुले-शाहू-आंबेडकर सार्वजनिक वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र अटकाळे यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार पत्रकार राहुल डी. गाढे, यांनी मानले.

  कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!