रावेर लोकसभा क्षेत्राच्या सोशल मीडिया समन्वयकपदी जयवंत चौधरी यांची निवड

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे



पक्षाच्या विचारधारा, भूमिका व जनहिताच्या कार्याचा सोशल मीडियातून प्रभावी प्रचार-प्रसार करण्याची जबाबदारी

रावेर : शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे तसेच युवासेनाप्रमुख आमदार मा. श्री. आदित्यसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा विचार, पक्षाची भूमिका, ध्येय-धोरणे तसेच जनहिताच्या विविध कार्यांचा सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार-प्रसार करून पक्षाचा विचार जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने जळगाव जिल्हा (रावेर लोकसभा क्षेत्र) (डिजी) सोशल मीडिया समन्वयक म्हणून कट्टर, एकनिष्ठ व कडवट शिवसैनिक श्री. जयवंत प्रभाकर चौधरी (राजपूत) यांची निवड करण्यात आली आहे.

(ads)

या निवडीबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकारी व शिवसैनिकांकडून जयवंत चौधरी यांचे भगवेमय वातावरणात अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

ही जबाबदारी पक्ष नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली पार पाडताना सोशल मीडिया हे पक्षाच्या विचारांचा आणि जनतेच्या प्रश्नांचा प्रभावी आवाज बनविण्याचा प्रयत्न राहणार आहे. पक्षाची अधिकृत भूमिका, संघटनात्मक उपक्रम, जनहिताची कामे तसेच सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम केले जाणार आहे.

(ads)

या निवडीसाठी शिवसेना उपनेते तथा नंदुरबार लोकसभा व रावेर लोकसभा संपर्कप्रमुख मा. गुलाबराव वाघ साहेब, मार्गदर्शक व आधारस्तंभ जिल्हा समन्वयक तथा माजी नगरसेवक मा. श्री. प्रल्हाददादा महाजन, रावेर लोकसभा जिल्हाप्रमुख तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व विद्यमान संचालक मा. श्री. योगीराजदादा पाटील, रावेर लोकसभा जिल्हाप्रमुख मा. श्री. ॲड. चंद्रकांतभाऊ शर्मा, जिल्हा उपसंघटक मा. श्री. अशोकदादा शिंदे, रावेर तालुकाप्रमुख मा. श्री. प्रमोददादा कोंडे, मुक्ताईनगर तालुकाप्रमुख मा. श्री. ॲड. राहुलभाऊ पाटील तसेच सर्व जिल्हा व तालुकास्तरीय पदाधिकारी यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभल्याचे सांगण्यात आले.

(ads)

दरम्यान, नवनियुक्त सोशल मीडिया समन्वयक जयवंत प्रभाकर चौधरी (राजपूत) यांनी पक्षाने दिलेली जबाबदारी पक्षाच्या प्रोटोकॉलनुसार आणि पूर्ण निष्ठेने पार पाडण्याचे आश्वासन दिले. पक्षहिताचा विचार, पक्षाची भूमिका व विचारधारा यांचा प्रचार-प्रसार करण्यासोबतच संघटना अधिक मजबूत करण्यासाठी सदैव कटिबद्ध राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

(ads)

जयवंत चौधरी यांच्या निवडीमुळे रावेर लोकसभा क्षेत्रातील शिवसेना संघटनेच्या सोशल मीडिया यंत्रणेला अधिक बळ मिळणार असून, पक्षाचा आवाज आणि जनतेचे प्रश्न सोशल मीडिया माध्यमातून अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचतील, असा विश्वास शिवसैनिकांकडून व्यक्त करण्यात आला.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!