बहिणाबाई चौधरी निसर्ग कन्या : प्रा डॉ महेंद्र सोनवणे

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे



सरदार वल्लभ भाई पटेल कला आणि विज्ञान महाविद्यालय ऐनपुर येथे बहिणाबाई चौधरी यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ जे बी अंजने हे होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात बहिणाबाईंचा कार्याचा आढावा मांडला. तर प्रमुख वक्ते म्हणून प्रा डॉ महेंद्र सोनवणे , मराठी विभाग प्रमुख यांनी बहिणाबाई चौधरी यांचे जीवन चरित्र सांगितले. यात त्यांनी प्रथमत: 

(ads) 

मानवी जीवनाचं तत्वज्ञान लेवा गणबोली‌ भाषेत कवितेच्या माध्यमातून सांगणाऱ्या‌ कवयित्री खान्देश कन्या बहिणाबाई चौधरी यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन केले. आपल्या व्याख्यानात त्यांनी बहिणाबाईंचा जन्म नागपंचमीच्या दिवशी २४ ऑगस्ट १८८० रोजी आसोदे जळगाव जिल्हा येथे महाजन परिवारात‌ झाला.आई,भिमाई, वडील उखाजी महाजन,तीन‌ भाऊ, तीन बहिणी होत्या.बहिणाबाई निरक्षर होत्या पण त्यांच्याजवळ जिवंत काव्यरचनेची‌ निसर्गदत्त देणगी होती. सारे आयुष्य शेतीकाम आणि घरकाम करता‌ करता‌ उत्स्फूर्तपणे‌ लेवागणबोलीत‌ गाणी रचून गात असत.

(ads) 

  बहिणाबाईंच्या कविता मृत्यूनंतर त्यांचा मुलगा सोपानदेव चौधरी व त्यांचे मावसभाऊ पितांबर चौधरी यांनी उतरवून घेतल्या आणि जपून ठेवल्यात. हे हस्तलिखित सोपानदेवांनी प्र.के.अत्रे यांना दाखविल्या. अत्रे म्हणाले अहो हे तर बावनकशी सोनं आहे ! महाराष्ट्रापासून लपवून न ठेवता त्या कविता आचार्य अत्रे यांनी १९५२ मध्ये प्रकाशित केल्यात ,धरतीच्या आरशामधी‌ सरग‌ ( स्वर्ग) पाहणाऱ्या या कवयित्रीचा महाराष्ट्राला परिचय झाला. या काव्यसंग्रहात‌ एकूण ३५ कविता आहेत.पण त्या अतिशय भावपूर्ण आहेत.

(ads) 

  बहिणाबाईंच्या कवितांमध्ये माहेर, सासर, शेतीची साधने,कापणी, मळणी,इ. कृषिविषयक विविध प्रसंग आणि अक्षयतृतीया,पोळा,पाडवा, इ. सण व उत्सव तसेच काही परिचित व्यक्ती, निसर्ग यावर कविता केल्या आहेत. उदा.

 अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर! आधी हाताला चटके तव्हा मियते भाकर !

   आला सास गेला सास,जीवा तुझं रे तंतर! अस जगन‌ -मरनं एका सासाच‌ अंतर

  असे जीवनाचं तत्त्वज्ञान अगदी साध्या सोप्या कमी शब्दात सहजपणे त्या सांगून गेल्यात.

 (ads) 

 ३ डिसेंबर १९५१ रोजी बहिणाबाई चौधरी यांचे निधन झाले. या कार्यक्रमास प्रा. पिरु गवळी, प्रा. अक्षय महाजन, प्रा. कोळी , विद्यार्थी आणि शिक्षकेतर कर्मचारी , प्राध्यापक वृंद उपस्थित होते. आभार प्रा. हर्षल म्हसाने यांनी मानले. तर कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. प्रदीप तायडे यांनी केले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!