ऐनपूर स.व.प. महाविद्यालयात राष्ट्रीय ग्रंथपाल दिन साजरा

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


ऐनपूर : ग्रंथालय शास्त्राचे जनक पद्मश्री डॉ. एस. आर. रंगनाथन यांची जयंती भारतात राष्ट्रीय ग्रंथपाल दिन म्हणून साजरी केली जाते. त्यानिमित्ताने ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय ग्रंथपाल दिन साजरा करण्यात आला.

(ads) 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रो. पी. आर. महाजन होते. त्यांच्या हस्ते पद्मश्री डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी आय.क्यू.ए.सी. समन्वयक डॉ. एस. एन. वैष्णव यांची प्रमुख उपस्थिती होती.

(ads) 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा. संदीप साळुंके यांनी केले. त्यांनी राष्ट्रीय ग्रंथपाल दिनाचे महत्त्व तसेच डॉ. एस. आर. रंगनाथन यांचे ग्रंथालय क्षेत्रातील योगदान याविषयी माहिती दिली.

(ads) 

यावेळी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या माध्यमातून वाचन संस्कृती, ग्रंथालयाचा शैक्षणिक विकासातील सहभाग आणि विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!