ऐनपूर : सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय, ऐनपूर येथे महाविद्यालयाच्या ग्रंथालयाच्या वतीने ‘पुस्तक पेढी’ योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना पुस्तक संचांचे वाटप करण्यात आले. मुंबई येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टच्या वतीने प्राप्त झालेले हे पुस्तक संच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आले.
(ads)
यावेळी प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, विद्यार्थ्यांनी या पुस्तक संचाचा अधिकाधिक उपयोग करावा. तसेच ग्रंथालयातील विविध अवांतर वाचन साहित्याचा नियमित वापर करून आपल्या ज्ञानात भर घालावी, असे आवाहन त्यांनी केले.
(ads)
महाविद्यालयातील अत्यल्प उत्पन्न गटातील, पुस्तके खरेदी करणे आर्थिकदृष्ट्या शक्य नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना उपयुक्त ठरत आहे. या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना संपूर्ण शैक्षणिक वर्षासाठी दोन्ही सत्रांमध्ये प्रत्येकी सुमारे २० पुस्तकांचा संच वापरासाठी देण्यात येतो. प्रत्येक संचाची किंमत अंदाजे ४ हजार रुपये असून, विद्यार्थ्यांना वर्षभर ही पुस्तके वापरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
(ads)
पुस्तक वितरण कार्यक्रमास ग्रंथालय समितीचे सदस्य प्रा. डॉ. पी. आर. महाजन, उपप्राचार्य डॉ. एस. एन. वैष्णव, प्रा. हेमंत बाविस्कर, प्रा. व्ही. एन. रामटेके, प्रा. जे. पी. नेहेते, प्रा. एस. एस. साळुंके, प्रा. डॉ. एम. के. सोनवणे, प्रा. डॉ. एस. पी. उमरीवाड, प्रा. अंकुर पाटील, श्री. महेंद्र महाजन, श्री. सर्वेश चौधरी तसेच योजनेतील विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन ग्रंथपाल प्रा. डॉ. एस. एस. साळुंके यांनी केले. उपस्थितांचे आभार प्रा. डॉ. व्ही. एन. रामटेके यांनी मानले.


