कै. गोविंदराज श्रीराजधर बाबा शास्त्री मराठे यांना श्रद्धांजली अर्पण करत नवभारत मित्र मंडळाने जल्लोषाला फाटा देत साधेपणाने केली गणेशोत्सवाची सांगता

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


दुःख आणि दुष्काळाच्या सावटात गणरायाला निरोप!

तालुका प्रतिनिधी : राहुल जयकर

सांगवी बुद्रुक, ता. यावल : गावातील नवभारत मित्र मंडळाच्या श्री गणेशाची यंदा अत्यंत साधेपणाने व शांततेत विसर्जन मिरवणूक काढून गणेशोत्सवाची सांगता करण्यात आली. श्री दत्त मंदिर, सांगवी बुद्रुकचे अध्यक्ष तसेच श्री चक्रधर गुरुकुल विद्या प्रसारक मंडळाचे सचिव आणि श्री चक्रधर गुरुकुल महाविद्यालय, फैजपूरचे प्राचार्य कै. प.पू.प.म. गोविंदराज श्रीराजधर बाबा शास्त्री मराठे यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. त्यातच यंदा वरुणराजाच्या लहरीपणामुळे शेतकरी बांधवांवर दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे.

(ads)

या दोन्ही परिस्थितींची जाणीव ठेवत नवभारत मित्र मंडळाने यंदाच्या गणेशोत्सवात जल्लोषाला फाटा देत साधेपणाने उत्सव साजरा केला. सामाजिक संवेदनशीलता आणि बांधिलकी जपत मंडळाने गणरायाला भावपूर्ण निरोप दिला.

(ads)

गणेश विसर्जनावेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पारंपरिक पद्धतीने गणरायाची पूजा-अर्चा केली. त्यानंतर ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशा जयघोषात गणरायाचे विसर्जन करण्यात आले. यावेळी दिवंगत कै. गोविंदराज श्रीराजधरबाबा शास्त्री मराठे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

(ads)

शेतकरी बांधवांवर आलेले दुष्काळाचे संकट दूर व्हावे, परिसरात समाधानकारक पाऊस पडावा, बळीराजाला सुख-समृद्धी लाभावी तसेच सर्वांच्या जीवनात सुख, शांती आणि आनंद नांदावा, अशी प्रार्थना गणरायाच्या चरणी करण्यात आली.

(ads)

यावेळी नवभारत मित्र मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शांतता, संयम आणि सामाजिक संवेदनशीलतेचा संदेश देत नवभारत मित्र मंडळाने यंदाच्या गणेशोत्सवाची सांगता केली.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!