रावेर येथे उद्या भव्य रोजगार महाकुंभ - नामांकित कंपन्यांमध्ये युवकांना नोकरीची संधी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


महाराष्ट्र शासनाच्या संकल्पनेतून साकारलेला पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा - श्री विठ्ठलराव शंकरराव नाईक महाविद्यालयात आयोजन

रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) - बेरोजगार युवक-युवतींसाठी सुवर्णसंधी! महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव आणि रावेर येथील श्री. विठ्ठलराव शंकरराव नाईक कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय रावेर यांच्या संयुक्त विद्यमाने "रोजगार महाकुंभ - महाराष्ट्र" अंतर्गत भव्य पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

हा रोजगार मेळावा *मंगळवार, दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता* श्री. विठ्ठलराव शंकरराव नाईक महाविद्यालय, बऱ्हाणपूर रोड, रावेर येथे होणार आहे.

या मेळाव्यात नामांकित कंपन्यांमध्ये बिझनेस ऑफिसर, ट्रेनी, कस्टमर रिलेशनशिप ऑफिसर, वर्कर, वेल्डर, सर्व्हिस इंजिनिअर, विमा प्रतिनिधी, रिसेप्शनिस्ट, टेली कॉलर आदी पदांसाठी भरती केली जाणार आहे. यासाठी १० वी पास, आय.टी.आय, डिप्लोमा, ग्रॅज्युएट, एम.बी.ए. उत्तीर्ण उमेदवार पात्र असून १८ ते ३५ वयोगटातील युवकांना संधी आहे.

रावेर परिसर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आदरणीय हेमंतशेठजी नाईक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल पाटील, मग. संदीप गायकवाड सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र जळगाव,मा.जसपालसिंग गिरासे, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र रावेर,डॉ.प्रतीकशेठजी नाईक कार्यालयीन अधीक्षक श्री युवराज बिरपण,नोडल अधिकारी डॉ. सी. पी. गाढे, उपप्राचार्य प्रा. एस.यु.पाटील, उपप्राचार्य डॉ. संदीप धापसे, आयक्यूएसी समन्वयक डॉ. बी. जी.मुख्यादल, क्रीडा संचालक डॉ. यू.एन. पाटील ,अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ.एस.बी.धनले आणि महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी रावेर तालुक्यासह जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थी व नोकरी इच्छुक युवक-युवतींनी या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!