ऐनपूर ता.रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा, महाराष्ट्र प्रदेशच्या कार्यकारिणीची नुकतीच घोषणा करण्यात आली असून, रावेर तालुक्यातील ऐनपूर येथील श्री. विकास भाऊ (मिलिंदभाऊ)अवसरमल यांची उत्तर महाराष्ट्र सहसंपर्क प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे.
(ads)
महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. आ. श्री. रविंद्रजी चव्हाण, अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष श्री. विश्वजीतजी गायकवाड तसेच महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित जाती मोर्चाच्या प्रभारी मा. आ. श्रीमती माधवीताई नाईक यांनी प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली. या कार्यकारिणीत विकास अवसरमल यांच्यावर उत्तर महाराष्ट्रातील अनुसूचित जाती मोर्चाच्या संघटनात्मक कार्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
(ads)
ही निवड भारतीय जनता पार्टीचे पूर्व विभागाचे जिल्हाध्यक्ष मा. श्री. चंद्रकांत भाऊ बाविस्कर, मा. आ. श्री. नंदू भाऊ महाजन, मा. आ. श्री. अमोलदादा जावळे, मा. श्री. अशोकभाऊ कांडेलकर, माजी अध्यक्ष जि. प. जळगाव तसेच मा. श्री. डॉ. राजेंद्रजी फडके, राष्ट्रीय संयोजक ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ यांच्या शिफारशीवरून करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
(ads)
विकास अवसरमल यांच्या निवडीबद्दल मा. ना. श्री. गिरीशभाऊ महाजन, मा. ना. श्रीमती रक्षाताई खडसे, मा. ना. श्री. संजयभाऊ सावकारे, मा. खा. श्रीमती स्मिताताई वाघ, मा. आ. श्री. राजूमामा भोळे आणि मा. आ. श्री. मंगेशदादा चव्हाण यांनी अभिनंदन केले.
(ads)
तसेच माजी आ. श्री. अरुणदादा पाटील, भाजपा ज्येष्ठ नेते श्री. सुरेशभाऊ धनके, श्री. शिवाजीराव पाटील, श्री. पद्माकरभाऊ महाजन, जिल्हा उपाध्यक्ष श्री. अरुण शिंदे, मंडल प्रभारी श्री. विजय महाजन, सावदा मंडल अध्यक्ष श्री. दुर्गेश पाटील, श्री. जितूभाऊ पाटील, माजी सभापती व जिल्हा चिटणीस श्री. दुर्गादासभाऊ पाटील, श्री. महेशभाऊ चौधरी, अनुसूचित जमाती जिल्हाध्यक्ष हरलालभाऊ कोळी, कोळी समाजाचे ज्येष्ठ नेते श्री. संतोषभाऊ सपकाळे, अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष जळगाव पूर्व श्री. नागेश्वर साळवे, सरचिटणीस श्री. जगदीश घेटे, जिल्हा उपाध्यक्ष श्री. राजूभाऊ सुवर्णे, श्री. कमलेश महाजन, श्री. शुभम पाटील, युवा मोर्चा मंडल अध्यक्ष के. ओ. महाजन, श्री. राजेंद्र विठ्ठल पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष श्री. काशिनाथ पाटील, निलेश जैस्वाल, शेख रफिक शेख अजीज, श्री. विलासभाऊ अवसरमल, श्री. नगीन सुवर्ण, श्री. विजय काशिनाथ अवसरमल यांच्यासह भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले.
(ads)
विकास अवसरमल यांच्या निवडीमुळे ऐनपूरसह रावेर तालुक्यातील भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.


