चिनावलमध्ये पहिले ऐतिहासिक महिला धम्म प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


११३ उपासिकांचा उत्स्फूर्त सहभाग; भदंत नागवंश महाथेरो यांचे मोलाचे मार्गदर्शन

चिनावल ता.रावेर (किरण भिमराव भालेराव) :
चिनावल येथील भीम ज्योती बुद्ध विहारात वर्षावासानिमित्त आयोजित करण्यात आलेले पहिले ऐतिहासिक एकदिवसीय महिला धम्म प्रशिक्षण शिबिर रविवार, दि. ६ सप्टेंबर २०२६ रोजी अत्यंत उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाले. भीम ज्योती बुद्ध विहार समिती तसेच उपासक-उपासिकांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिराला पंचक्रोशीतील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तब्बल ११३ उपासिकांनी अधिकृत नोंदणी करून या धम्म प्रशिक्षणाचा लाभ घेतला.

(ads)

शिबिरासाठी पूजनीय भदंत नागवंश महाथेरो (नागपूर) यांचे मुख्य मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन लाभले. त्यांच्या प्रभावी आणि अभ्यासपूर्ण मार्गदर्शनामुळे उपस्थित महिलांना धम्म, सामाजिक प्रबोधन तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्त्री उद्धाराच्या कार्याची प्रेरणादायी माहिती मिळाली.

(ads)

“बाबासाहेब हेच स्त्रियांचे खरे उद्धारकर्ते”

– भदंत नागवंश महाथेरो

मार्गदर्शन करताना भदंत नागवंश महाथेरो यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांच्या स्वातंत्र्य, समानता आणि सन्मानासाठी केलेल्या ऐतिहासिक कार्यावर प्रकाश टाकला. समाजाच्या प्रगतीमध्ये महिलांची भूमिका किती महत्त्वाची आहे, हे विविध उदाहरणांद्वारे त्यांनी स्पष्ट केले.

“एखाद्या समाजाची प्रगती ही त्या समाजातील महिलांच्या प्रगतीवरून मोजली पाहिजे,” हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार उपस्थित महिलांसमोर त्यांनी प्रभावीपणे मांडला. धम्माचा दैनंदिन जीवनात अंगीकार कसा करावा, धम्माचा प्रचार-प्रसार योग्य पद्धतीने कसा करावा आणि महिलांनी धम्मानुसार आपले आचरण कसे घडवावे, याबाबतही त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

(ads)

महापुरुषांच्या पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात

कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या पूजनाने करण्यात आली. चिनावल गावाच्या लोकनियुक्त सरपंच सौ. ज्योती संजय भालेराव, बाहेरून आलेल्या महिला तसेच स्थानिक उपासिकांच्या हस्ते महापुरुषांचे पूजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक भीम ज्योती बुद्ध विहाराचे अध्यक्ष आयुष्मान संजय भालेराव यांनी केले, तर सूत्रसंचालन माधुरीताई गणेश भालेराव यांनी केले.

११३ उपासिकांचा प्रमाणपत्र देऊन गौरव

शिबिराच्या समारोपप्रसंगी सहभागी झालेल्या सर्व ११३ उपासिकांना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या उपक्रमामुळे महिलांमध्ये धम्मविषयक जागृती, आत्मविश्वास आणि सामाजिक बांधिलकीची भावना अधिक दृढ झाल्याचे चित्र दिसून आले.

(ads)

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी भीम ज्योती बुद्ध विहार समितीच्या सर्व सदस्यांसह सविता भालेराव, सोनाली सपकाळे, सीमा भालेराव, माधुरी भालेराव, संगीता भालेराव, सारिका भालेराव, मीना भालेराव आणि करुणा ठाकरे यांनी विशेष परिश्रम घेतले.

(ads)

पंचक्रोशीतील महिलांची लक्षणीय उपस्थिती, ११३ उपासिकांचा सहभाग आणि धम्मविषयक मार्गदर्शनाला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हे या ऐतिहासिक शिबिराचे ठळक वैशिष्ट्य ठरले. चिनावलमध्ये महिला धम्म प्रशिक्षणाची ही सुरुवात भविष्यातील व्यापक धम्मजागृतीसाठी प्रेरणादायी पाऊल ठरणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!