१७ वर्षांआतील ५१ किलो ग्रीको-रोमनमध्ये ओम श्रीराम चौधरीचे जिल्हास्तरावर सुवर्णयश : नाशिक विभागीय स्पर्धेसाठी निवड

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


यावल ( सुरेश पाटील ) ओम श्रीराम चौधरीचे जिल्हास्तरावर सुवर्णयश, नाशिक विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

मेहनत, जिद्द आणि सातत्याला यशाची साथ मिळते याचा प्रत्यय पुन्हा एकदा भडगाव तालुक्याने दिला आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव आणि जळगाव जिल्हा कुस्तीगीर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत कोळगावच्या गोपीचंद पुना पाटील विद्यालयाच्या मल्लांनी निर्विवाद वर्चस्व गाजवले.


या स्पर्धेत इयत्ता १० वी चा विद्यार्थी ओम श्रीराम चौधरी याने १७ वर्षांआतील ग्रीको-रोमन कुस्तीच्या ५१ किलो वजनी गटात सर्व प्रतिस्पर्ध्यांना लोळवत प्रथम क्रमांक पटकावला आणि सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. सुरुवातीपासूनच आत्मविश्वासपूर्ण खेळ करत, प्रतिस्पर्ध्यांच्या प्रत्येक डावपेचाला तांत्रिक कौशल्याने उत्तर देत ओमने अंतिम फेरीतही संयम आणि आक्रमकतेचे अचूक संतुलन राखले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!