पंख्याविना यावल ग्रामीण रुग्णालय; रुग्णांची गैरसोय, सुविधांवर प्रश्नचिन्ह

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


यावल ( सुरेश पाटील ) तालुक्यातील ग्रामीण व शहरातील नागरिकांसाठी महत्त्वाचे असलेल्या ग्रामीण रुग्णालय यावल येथे रुग्णांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याची बाब समोर आली आहे.


रुग्णालयातील काही ठिकाणी पंख्यांची पुरेशी व्यवस्था नसल्याने उकाड्यात रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना त्रास सहन करावा लागत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

(ads)

रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना स्वच्छ,सुरक्षित आणि आरोग्यदायी वातावरण मिळणे अपेक्षित असताना पंख्यांसारख्या मूलभूत सुविधांचीही कमतरता का ? असा सवाल रुग्णांकडून उपस्थित केला जात आहे.

(ads)

निधी येतो तरी सुविधा कुठे ?

ग्रामीण रुग्णालयातील विविध सोयी-सुविधा,दुरुस्ती,देखभाल तसेच आवश्यक साहित्यांसाठी जिल्हास्तरावरून निधी उपलब्ध होत असल्याचे सांगितले जाते. मात्र,हा निधी नेमका कोणकोणत्या कामांसाठी मंजूर होतो, किती निधी प्राप्त होतो, कोणत्या कामांवर किती खर्च केला जातो आणि प्रत्यक्षात कोणती कामे केली जातात? याबाबत पारदर्शकता असावी, अशी मागणी होत आहे.

(ads)

विशेष म्हणजे, रुग्णालयातील मूलभूत सुविधांची अशी अवस्था असेल तर उपलब्ध निधीचा विनियोग योग्य पद्धतीने होत आहे का,याची चौकशी करण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

भूषण नेमाडे यांची प्रत्यक्ष पाहणी

यावल शहरातील सर्वसामान्य समाजसेवक भूषण नेमाडे यांनी ग्रामीण रुग्णालयाची प्रत्यक्ष पाहणी करून रुग्णांच्या सुविधांबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. रुग्णालयात येणाऱ्या नागरिकांना आवश्यक सुविधा मिळणे हा त्यांचा अधिकार असून, प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.दरम्यान, ग्रामीण रुग्णालयातील सुविधांसाठी जिल्हा रुग्णालयाकडून प्राप्त निधीचा तपशील सार्वजनिक करण्यात यावा, तसेच मागील काही वर्षांत करण्यात आलेल्या कामांची चौकशी करून प्रत्यक्ष पाहणी करावी,अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

(ads)

रुग्णांच्या मूलभूत सुविधांसाठी निधी असूनही पंखे आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध होत नसतील, तर याची जबाबदारी नेमकी कोणाची? असा प्रश्न आता यावलकरांकडून उपस्थित केला जात आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!