ऐनपूर : सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय, ऐनपूर येथे विद्यार्थी विकास विभागाच्या ‘ऋतुमती अभियानांतर्गत’ विद्यार्थी आरोग्य तपासणी व रक्तगट तपासणी शिबिराचे आयोजन विद्यार्थी विकास मंडळातर्फे करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांच्या हस्ते करण्यात आले.
(ads)
यावेळी उद्घाटनपर मनोगतात प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांनी विद्यार्थ्यांनी निरोगी व सुदृढ आयुष्य जगण्यासाठी नियमित व्यायामासोबतच सकारात्मक आचार-विचार आणि संतुलित जीवनशैली आवश्यक असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी आपल्या आरोग्याकडे गांभीर्याने लक्ष देत नियमित आरोग्य तपासणी करून घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.
(ads)
शिबिरात डॉ. सचिन आर. पाटील व डॉ. संदीप चौधरी यांनी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन व सल्ला दिला. डॉ. सचिन पाटील यांनी आपला रक्तगट माहीत असणे आपत्कालीन परिस्थितीत अत्यंत महत्त्वाचे ठरते, याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच शरीरातील रक्ताची मात्रा व आरोग्य संतुलित ठेवण्यासाठी पौष्टिक व योग्य आहार घेणे आवश्यक असल्याचे डॉ. संदीप चौधरी यांनी सांगितले.
(ads)
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी विकास विभागाचे अधिकारी प्रा. हेमंत बाविस्कर यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. एस. एन. वैष्णव यांनी केले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. डॉ. पी. आर. महाजन, डॉ. जे. पी. नेहेते, प्रा. अंकुर पाटील, प्रा. ज्ञानेश्वर कोळी, प्रा. प्रदीप तायडे, प्रा. अक्षय महाजन तसेच हर्षल पाटील, श्रेयश महाजन व अंकुर पाटील यांनी परिश्रम घेतले. या आरोग्य शिबिरास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.


