बोरावल टाकरखेडा शिवारात शेतमजूर महिलांना शिवीगाळ करून सोन्याची पोत लंपास

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


यावल  ( सुरेश पाटील )

यावल शहरात शेतकरी व शेतमजूर महिलांमध्ये मोठी खळबळ आणि घबराटीचे वातावरण निर्माण झाले. याबाबत सविस्तर माहिती अशी की सोमवार दि.१२ ऑक्टोबर २०२६ रोजी यावल शहरातील ५ ते ७ महिला बोरावल टाकरखेडा शिवारात शेतमजुरी साठी गेले होते.शेतातून दुपारी घरी परत येण्याच्या तयारीत असताना मोटर सायकल ( मोटरसायकल क्रमांक एम.एच. १९- ०४६२ ) वरून मद्य प्राशन केलेला एक व्यक्ती त्यांच्याजवळ येऊन शेतमजूर महिलांना शिवीगाळ करून एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावून मोटर सायकल त्याच ठिकाणी सोडून पळून गेला.सदर महिलांनी यावल पोलीस स्टेशनला येऊन सदर घटनेची माहिती व तक्रार दिली तसेच घटनेमधील मोटरसायकल सुद्धा यावल पोलीस स्टेशनला जमा केल्याचे दिसत आहे. पुढील चौकशी आणि तपास यावल पोलीस करीत आहेत.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!