ऐनपूर महाविद्यालयात गांधी विचार संस्कार परीक्षा २०२६ उत्साहात संपन्न

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


ऐनपूर : सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय, ऐनपूर येथे गांधी रिसर्च फाउंडेशन, जळगाव यांच्या वतीने आयोजित ‘गांधी विचार संस्कार परीक्षा २०२६’ गुरुवार, दि. ८ ऑक्टोबर २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या परीक्षेत महाविद्यालयातील २६ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.


महात्मा गांधीजींचे विचार, सत्य, अहिंसा, स्वावलंबन, सामाजिक बांधिलकी आणि मूल्याधिष्ठित जीवनपद्धती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी परीक्षेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत गांधी विचारांचा अभ्यास करण्याची आपली जिज्ञासा व्यक्त केली.


परीक्षेच्या आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने तसेच उपप्राचार्य प्रा. डॉ. एस. एन. वैष्णव यांचे मार्गदर्शन लाभले. परीक्षेचे समन्वयक म्हणून प्रा. डॉ. पी. आर. गवळी यांनी जबाबदारी सांभाळली. परीक्षेच्या सुरळीत आयोजनासाठी पर्यवेक्षक प्रा. प्रदीप तायडे व प्रा. अक्षय महाजन यांनी परिश्रम घेतले.


गांधीजींच्या विचारांची विद्यार्थ्यांना ओळख करून देणाऱ्या अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्ये, सामाजिक जाणीव, सत्य-अहिंसा आणि जबाबदार नागरिकत्वाची भावना विकसित होण्यास निश्चितच मदत होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!