यावल नगरपरिषद सभागृहात विविध विकासकामांच्या विषयांवर चर्चा : सभागृहात कुत्र्याचा विषय गाजला

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 



यावल  (सुरेश पाटील)

पाणीपुरवठा,नगरपालिकेच्या मालकीच्या काही विहिरी आणि इलेक्ट्रिक पंप दुरुस्त करणे तसेच नालेसफाई,हरित पट्टा,एबीसी सेंटरसह विविध विषय अजेंड्यावर घेण्यात आले होते. शहर विकासाच्या कामांना गती देण्याबाबत सर्वानुमते विषय मंजूर करण्यात आले परंतु मयत कुत्र्याबाबत संबंधित कर्मचाऱ्याने न.प.सदस्यांची दिशाभूल केल्याने विषय गाजला.


यावल नगरपरिषदेच्या सभागृहात आज शुक्रवार, दि. ३० ऑक्टोबर २०२६ रोजी नगराध्यक्षां सौ छायाताई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रभारी मुख्याधिकारी अभिजीत बाविस्कर यांच्या उपस्थितीत आयोजित सभेत शहरातील विविध विकासकामे आणि नागरी सुविधांशी संबंधित महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात आली.

या सभेच्या नगरपरिषद हद्दीतील विविध विकासकामे,एबीसी सेंटर व संबंधित सुविधांचे बांधकाम, नाले गाळीकरण व साफसफाई, नगरपरिषदेच्या जागेत हरित पट्टा विकसित करणे,तसेच सन २०२६-२०२७ या वर्षातील पाणीपुरवठा व्यवस्थेसाठी तरंगत्या पंपाची (अंदाजे २५० एचपी क्षमतेपर्यंत) खरेदी करण्याबाबत विचारविनिमय करण्याचे विषय समाविष्ट होते.

याशिवाय हिंदू स्मशानभूमीकडे जाणाऱ्या पुलाच्या कामाला मुदतवाढ देणे आणि सन २०२५-२०२६ मधील पाणीपुरवठा व इतर विभागांसाठी आवश्यक मनुष्यबळ पुरवठ्याच्या कामास मुदतवाढ देण्याबाबतही विषयपत्रिकेत समावेश करण्यात आला होता.

शहरातील मूलभूत सुविधा, स्वच्छता,पाणीपुरवठा आणि प्रलंबित विकासकामांच्या दृष्टीने ही सभा महत्त्वपूर्ण ठरली. या विषयांवर झालेल्या चर्चेनंतर प्रत्यक्ष कामांना कितपत गती मिळते आणि नागरिकांच्या अपेक्षांची पूर्तता कशी होते, याकडे यावलकरांचे लक्ष लागले आहे.


सभेत नगरसेविका सविता नन्नवरे यांनी मयत कुत्र्यांचा विषय काढल्यानंतर न.प.सदस्य हेमराज उर्फ बाळू फेगडे, उमाकांत फेगडे यांनी मयत झालेल्या कुत्र्याबाबत सभागृहात संबंधित कर्मचाऱ्याला जाब विचारला असता त्याने उडवा उडवीचे उत्तरे दिली.परंतु माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अतुल वसंतराव पाटील यांनी यावल शहरातील भटक्या आणि नागरिकांसह मुलांच्या अंगावर धावून भुंकणाऱ्या कुत्र्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी प्राणी जन्मदर नियंत्रण केंद्र आणि जागतिक प्राणी हक्क संस्था पेटाच्या नियमाचे तंतोतंत पालन नियुक्त केलेल्या संस्थेमार्फत यावल नगरपरिषद करीत असल्याचे माहिती देत कुत्र्यांना कोणतीही इजा न होता पकडले जात असून नियमानुसार त्यांचे संरक्षण आणि त्यांना वेळेवर खाण्यापिण्याची व्यवस्था केली अशी माहिती दिली.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!