के-हाळे बु. येथे वर्षावासानिमित्त विशेष धम्मदेशना व व्याख्यान उत्साहात संपन्न

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे



‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर बोधिसत्व कसे?’ विषयावर अभ्यासपूर्ण धम्मदेशना

रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : भारतीय बौद्ध महासभा, जिल्हा शाखा जळगाव (पूर्व) अंतर्गत तालुका रावेर शाखेच्या वतीने वर्षावासानिमित्त आयोजित विशेष धम्मदेशना व व्याख्यानाचा कार्यक्रम मौजे के-हाळे बु., ता. रावेर येथे रविवारी (दि. ४ ऑक्टोबर) मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

या कार्यक्रमात ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर बोधिसत्व कसे?’ या अत्यंत महत्त्वपूर्ण आणि वैचारिक विषयावर भारतीय बौद्ध महासभेचे रावेर तालुका अध्यक्ष गौतम अटकाळे यांनी अभ्यासपूर्ण धम्मदेशना दिली.

(ads)

आपल्या ओघवत्या आणि प्रभावी शैलीत मार्गदर्शन करताना गौतम अटकाळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मानवकल्याणासाठीचे महान कार्य, त्यांचा संघर्ष, त्याग, सामाजिक परिवर्तनासाठीचे योगदान तसेच धम्माच्या प्रसारासाठी त्यांनी केलेले कार्य यांचा सविस्तर ऊहापोह केला. बाबासाहेबांचे जीवन हे केवळ एका व्यक्तीचे जीवन नसून, वंचित आणि शोषित समाजाच्या मुक्तीचा संघर्ष असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

(ads)

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना रावेर तालुका कोषाध्यक्ष आदरणीय महेंद्र वानखेडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना प्राप्त झालेल्या ‘बोधिसत्व’ या सन्मानामागील ऐतिहासिक व धम्मविषयक संदर्भ उपस्थितांसमोर मांडला.

या विशेष व्याख्यानास तालुका संस्कार विभागाचे उपाध्यक्ष आदरणीय सदाशिव निकम, संस्कार विभाग सचिव आदरणीय महेंद्र तायडे, प्रचार व पर्यटन विभागाचे उपाध्यक्ष आदरणीय तनिष बोदडे, तालुका संघटक आदरणीय आकाश ठाकणे यांच्यासह के-हाळे बु. येथील जीवन तायडे सर, राजेंद्र इंगळे तसेच भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने उपासक-उपासिका उपस्थित होते.

(ads)

वर्षावासात ज्ञानरूपी धम्मदेशनेने निर्माण केले वैचारिक चैतन्य पवित्र काळात आयोजित करण्यात आलेल्या या ज्ञानरूपी धम्मदेशनेमुळे उपस्थितांमध्ये धम्मविषयक जागृती, वैचारिक प्रगल्भता आणि सामाजिक बांधिलकीची भावना निर्माण झाली. उपस्थित धम्मबंधू-भगिनींनी या अभ्यासपूर्ण धम्मदेशनेचा मनमुराद लाभ घेतला.

भारतीय बौद्ध महासभा, तालुका शाखा रावेर आणि समस्त बौद्ध समाज, के-हाळे बु यांच्या वतीने कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले होते. उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात कार्यक्रमाची यशस्वी सांगता झाली.


#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!