यावल ( सुरेश पाटील )
सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नाशिक येथील 'एस्पायर फाउंडेशन' या नामांकित संस्थेच्या वतीने देण्यात येणारा 'राज्यस्तरीय उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार' जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजोरे (ता. यावल, जि. जळगाव) येथील उपक्रमशील मुख्याध्यापक रवींद्र प्रकाश पाटील यांना जाहीर झाला.
दिनांक १८ ऑक्टोबर २०२६ रोजी संस्थेकडून या पुरस्काराची अधिकृत घोषणा करण्यात आली.जिल्हा परिषद शाळेत राबवलेले विविध नवोपक्रम, 'उपक्रमशीलतेकडून गुणवत्तेकडे' वाटचाल करत विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश,डिजिटल अध्यापन आणि सामाजिक बांधिलकीतून शाळेचा केलेला कायापालट या सर्व कार्याची दखल घेऊन फाउंडेशनने पाटील यांची या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड केली आहे.
उपक्रमशीलता ते गुणवत्तेचा आदर्श वस्तुपाठ मुख्याध्यापक रवींद्र पाटील यांनी जि.प.शाळा राजोरे येथे पदभार स्वीकारल्यापासून शाळेत अनेक नावीन्यपूर्ण शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबवले आहेत:- 1.निपुण दिशा व क्यूआर कोड डिजिटल साहित्य: मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान (FLN) वाढवण्यासाठी क्यूआर कोडयुक्त शैक्षणिक साहित्याची निर्मिती केली,ज्याची तालुकास्तरावर विशेष प्रशंसा झाली आहे.- 2.'श्रमसृष्टी परसबाग': विद्यार्थ्यांना निसर्ग आणि कष्टाचे महत्त्व पटवून देण्यासाठी शाळेत समृद्ध परसबाग फुलवून निसर्गपूरक शिक्षणाचा वस्तुपाठ घालून दिला. 3.कौशल्य विकास व सामाजिक उपक्रम: विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी कापसाच्या वाती बनवणे, बांबूच्या टोपल्या विणणे, पर्यावरण पूरक गणपती बनवणे यांसारखे कार्यशाळा उपक्रम आणि
4.दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना मदत मिळवून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केले आहे 5- शाळेसाठी मोठ्या प्रमाणात लोक सहभाग उभा केलेला आहे. सर्वस्तरातून कौतुकाचा वर्षाव ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेला गुणवत्तेच्या शिखरावर नेण्यासाठी अहोरात्र धडपडणाऱ्या एका ध्येयवेड्या शिक्षकाच्या कार्याचा हा राज्य स्तरीय सन्मान ठरला आहे. या पुरस्काराची घोषणा होताच शिक्षण क्षेत्रातील सर्व आदरणीय अधिकारी वर्ग,शिक्षक वृंद व शाळा व्यवस्थापन समिती राजोरे,पालक,परिसरातील ग्रामस्थ,शिक्षणप्रेमी,परिवार
नातेवाईक,मित्रपरिवार,सहशिक्षक आणि विद्यार्थ्यांकडून रवींद्र पाटील यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.हा पुरस्कार केवळ माझा एकट्याचा नसून आपणा सर्वांचा हा पुरस्कार आहे मी केवळ प्रतिनिधित्व केले असे मत रवींद्र पाटील सरांनी प्रसंगी व्यक्त केले.



