https://maps.app.goo.gl/JQ3Wo14nZFUKhRVZ6?g_st=ac

 

https://wa.me/+919834272080

विटवे ग्रामपंचायत कार्यालय येथे २६ नोव्हेंबर संविधान दिन उत्साहात साजरा; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे



विटवे ता.रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या भारतीय संविधानाच्या गौरवशाली वारशाची आठवण करून देणारा २६ नोव्हेंबर 'संविधान दिन' विटवे येथे मोठ्या उत्साहात आणि वैचारिक वातावरणात साजरा करण्यात आला.

विटवे ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात संविधानाचे महत्त्व, लोकशाही मूल्ये, सामाजिक समता, बंधुता, स्वातंत्र्य आणि न्याय या विषयांवर मान्यवरांनी आपले विचार मांडले. त्यांनी संविधानाच्या विविध पैलूंवर सविस्तर मार्गदर्शन केले तसेच संविधानातील मूल्ये प्रत्येक नागरिकाने आपल्या दैनंदिन जीवनात आत्मसात करणे गरजेचे असल्याचे अधोरेखित केले.

या कार्यक्रमाला लोकनियुक्त सरपंच मुकेश चौधरी, उपसरपंच ईश्वर चौधरी, ग्रामपंचायत सदस्य साहेबराव वानखेडे, गणेश मनुरे, मधुकर पाटील, सुरेश कोळी, गजानन कोळी, पोलीस पाटील बाळू पवार, कैलास मनुरे, विमलबाई भिल्ल यांच्यासह विटवे गावातील संघर्ष मित्र मंडळ व विविध क्षेत्रांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपूर्ण कार्यक्रम संविधानाच्या विचारांचा जागर करणारा आणि सामाजिक एकात्मता, समता व बंधुतेचा संदेश देणारा ठरला. संविधानाचा सन्मान, संविधानिक मूल्यांचे जतन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्याचा संकल्प व्यक्त करत विटवे ग्रामपंचायत कार्यालयात संविधान दिनाचा हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.