नितीन गंगाधर कोळी यांची आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे संघर्ष समितीच्या यावल तालुका युवा अध्यक्षपदी नियुक्ती

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


यावल (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे प्रणित संघर्ष समितीच्या यावल तालुका युवा अध्यक्षपदी आदिम. नितीन गंगाधर कोळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. समितीचे अध्यक्ष आदिम. मा. दत्ताभाऊ सुरवसे यांच्या आदेशानुसार त्यांना नियुक्तीपत्र देऊन ही जबाबदारी सोपविण्यात आली.

(ads)

आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या संघर्षमय जीवनाचा इतिहास, विचार आणि प्रेरणा समाजातील तरुणांपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच आदिवासी समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी संघटितपणे कार्य करण्याच्या उद्देशाने ही नियुक्ती करण्यात आली आहे.

(ads)

नियुक्तीपत्रात नितीन कोळी यांनी आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या संघर्षमय विचारांचा सक्रियपणे प्रचार व प्रसार करावा, तसेच संघर्ष समितीच्या वाढीसाठी सर्वांना सोबत घेऊन संघटनात्मक कार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

(ads)

यासोबतच आदिवासी कोळी महादेव, डोंगर कोळी, कोळी मल्हार, टोकरे कोळी, कोळी ढोर आदी समाजघटकांना न्याय मिळवून देण्यासाठी सुरू असलेल्या संघर्षात महत्त्वपूर्ण योगदान देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. स्थानिक स्तरावर कार्यकर्त्यांची नियुक्ती करून संघटनेचा विस्तार करण्याची जबाबदारीदेखील त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

(ads)

या नियुक्तीमुळे यावल तालुक्यात संघटनेच्या कार्याला अधिक गती मिळेल, असा विश्वास व्यक्त होत असून नितीन गंगाधर कोळी यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

नवीन जबाबदारीसाठी नितीन गंगाधर कोळी यांना संघर्ष समितीच्या वतीने पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.