निंभोरा बुद्रुक येथे सार्वजनिक डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती गठीत

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


भुसावळ:- तालुक्यातील निंभोरा बुद्रुक येथे डॉ. आंबेडकर जयंती उत्सव समिती स्थापन करण्यासाठी बैठक त्रिरत्न बुद्ध  विहार,निंभोरा येथे एन.टी.इंगळे यांच्या अध्यक्ष खाली संपन्न झाली.

या बैठकीला प्रमुख उपस्थितीत प्रकाश सरदार,सी.एम.यावलकर,रमेश सिरसाठ,रमेश खंडारे,दीपक सुरवाडे ,मनीष सुरवाडे,अरुण भालेराव,यांच्या सह भारतीय बौद्ध महासभा शाखा अध्यक्षा उषाताई सुरवाडे,सरचिटणीस प्रज्ञा खंडारे.केंद्रीय शिक्षिका करुणा नरवाडे, चंदा खंडारे,वैशाली जाधव ,प्रज्ञा मेश्राम,रत्ना नाईक यांच्या सह गावातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते .

या बैठकीत १४ एप्रिल २०२७ ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती  साजरी करण्यात येणार आहे. यावेळी पुढील प्रमाणे नवीन कार्यकारणी सर्वानुमते निवडण्यात आली.

अध्यक्ष सुमेध कांबळे,कार्याध्यक्ष आशिष सुरवाडे,सचिव सूरज पवार,उपाध्यक्ष कुणाल इंगळे, कोष्याध्यक्ष दिनेश साळवे,प्रसिद्धी प्रमुख रमेश खंडारे,सह कोष्याध्यक्ष,प्रणव मेश्राम,संघटक अविनाश जाधव,सल्लागार एन. टी. इंगळे,रमेश सिरसाठ,सी.एम .यावलकर,करुणा नरवाडे,उषा सुरवाडे,चंदा खंडारे,सदस्य गौरव नरवडे,मनीष सुरवाडे,विशाल जोहरे,अरुण भालेराव,उल्हास मोरे,सौरव सरदार,सागर नाईक,निखिल मेश्राम,तरुण गवई,विद्यानंद मेश्राम

बैठकीचे सूत्रसंचालन प्रकाश सरदार यांनी केले.