मोबाईलसोबत कार-बाईकचं आमिष,तर किराणा-सुपर शॉपीत खोट्या सूटचा खेळ..
बेकायदा रंगीत पॉम्पलेट छापून वृत्तपत्रात टाकून ग्राहकांना आकर्षित करण्याचा नवा फंडा.
यावल ( सुरेश पाटील)
जळगाव जिल्ह्यात सध्या अनेक ठिकाणी सणासुदी आणि सेलच्या नावाखाली ग्राहकांची सर्रास फसवणूक सुरू आहे. एकीकडे मोबाईल दुकानांमध्ये कार-बाईक आणि 10-20 गिफ्टचं आमिष दाखवून जास्त पैसे उकळले जात आहेत,तर दुसरीकडे किराणा दुकान आणि सुपर शॉपीमध्ये ‘मेगा सेल’, ‘बाय 1 गेट 1’, ‘50 % सूट’ च्या बोर्डखाली खोटी सूट दाखवून ग्राहकांना लुटलं जात आहे. जळगाव शहरासह भुसावळ, यावल, रावेर,चोपडा,अमळनेर, एरंडोल, धरणगाव, पारोळा या तालुक्यांमध्ये हा प्रकार मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी रंगीत पॉम्पलेटचा सापळा
या दुकानदारांकडून आता नवा फंडा वापरण्यात येत आहे. शहरातील काही जणांच्या नावाने हजारो रंगीत,ग्लॉसी कलर जाहिरातीचे पॉम्पलेट छापले जात आहेत. हे पॉम्पलेट दररोज सकाळी विविध वृत्तपत्रांमध्ये बेकायदा अनधिकृत पणे टाकून घरोघरी पोहोचवले जात आहेत.
यात दैनिकांमध्ये अधिकृतरित्या जाहिराती न देता आयकर विभाग, विक्रीकर विभाग जीएसटी विभागाची शुद्ध दिशाभूल करून बेकायदा पॉम्पलेट छापले जाऊन दैनिकांचे दिशाभूल करून दैनिकांमध्ये पोम्प्लेटच्या माध्यमातून बेकायदा प्रसिद्धी करून ग्राहकांना आम्ही दाखवले जात आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणा आंधळी झाली आहे का.,? असा सुद्धा प्रश्न उपस्थित केला जात आहे
पॉम्पलेटवर कार,बाईक,एलईडी टीव्ही,सोन्याची नाणी,20 गिफ्ट फ्री असे मोठमोठ्या आकर्षक फोटो दाखवून ग्राहकांना दुकानात बोलावले जाते. प्रत्यक्षात दुकानात गेल्यावर त्या ऑफरचे नियम आणि अटी वेगळ्याच निघतात.
1. मोबाईल दुकानात कशी फसवणूक?
• दुकानाबाहेर आणि पॉम्पलेटवर ‘MEGA DHAMAKA OFFER, CAR-BIKE GIFTS, 20 GIFT, 10 GIFT, BUMPER LUCKY DRAW’ चे मोठे पोस्टर लावले जातात. ग्राहकाला आधी कूपन / रजिस्ट्रेशन फॉर्म भरायला लावला जातो.• मोबाईलचा खरा रेट लपवून 10 ते 20% जास्त किंमत सांगितली जाते. • फायनान्समध्ये रक्कम वाढवून लोन मंजूर केलं जातं.प्रोसेसिंग फी,इन्शुरन्स,एक्सेसरीजच्या नावावर एक्स्ट्रा पैसा घेतला जातो.शेवटी जे गिफ्ट दिलं जातं, त्याचा खर्च ग्राहकाच्याच खिशातून वसूल केलेला असतो.
एका ग्राहकाचा अनुभव - “कार जिंकण्याची ऑफर पॉम्पलेटवर वाचून गेलो, मोबाईलचा रेट 18,000 जास्त घेतला, फायनान्समध्ये 3,000 रुपये एक्स्ट्रा जोडले.” (2). किराणा आणि सुपर शॉपीत ‘सेल’च्या नावाखाली खेळ
हाच प्रकार आता किराणा आणि सुपर शॉपीमध्ये पण सुरू झाला आहे.
• MRP वर खोटी सूट: आधी किंमत वाढवून दाखवणे आणि मग ‘50% सूट’ लिहून मूळ किमतीतच विकणे. • मुदत संपलेला / संपत आलेला माल: सेलच्या नावाखाली एक्सपायरी जवळ आलेला तेल, बिस्कीट, मसाला, दूध पावडर, नमकीन स्वस्तात ढकलणे. • कॉम्बो ऑफरचा खेळ: 1 वर 1 फ्री सांगून खराब क्वालिटीचा दुसरा माल देणे, वजनात कमी देणे. • बिल न देणे: सेलमध्ये बिल देत नाहीत, त्यामुळे तक्रार करता येत नाही. • वजनात फसवणूक: पॅकिंगवर 1 किलो लिहून आत 900 ग्रॅम निघणे. • मोठ्या बोर्डवर एक भाव, बिलावर दुसरा भाव: काउंटरवर गेल्यावर भाव बदलणे.
सर्वसामान्य महिला, शेतकरी आणि ग्रामीण भागातील ग्राहक याला जास्त बळी पडत आहेत.
यावल शहरातही हाच प्रकार
यावल शहरातही अशाच रंगीत पॉम्पलेट वाटून आणि शहरात मोठमोठे बॅनर लावून सेलच्या नावाखाली ग्राहकांना आकर्षित केले जात आहे. ग्रामीण भागातून येणाऱ्या ग्राहकांना मोठ्या ऑफरचे आमिष दाखवून जास्त दराने मोबाईल आणि किराणा मालाची विक्री केली जात असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होत आहेत.
हा कायद्याने गुन्हा आहे
ग्राहक संरक्षण अधिनियम 2019 नुसार खोटी माहिती देणे, खोटी ऑफर दाखवणे, पॉम्पलेटद्वारे दिशाभूल करणे, जास्त पैसे घेणे,वजनात कमी देणे,एक्सपायरी माल विकणे हे सर्व दंडनीय अपराध आहेत.
प्रशासनाने तातडीने कारवाई करावी - नागरिकांची मागणी
जिल्हाधिकारी जळगाव, जिल्हा पुरवठा विभाग, अन्न व औषध प्रशासन, वैध मापनशास्त्र (वजन काटा) विभाग, पोलीस विभाग आणि ग्राहक संरक्षण विभाग, आयकर विभाग, जीएसटी विभाग, विक्रीकर विभाग यांनी जिल्ह्यातील अशा मोबाईल दुकाने, किराणा आणि सुपर शॉपींची अचानक तपासणी करावी.जिल्हाधिकारी यांच्याकडून रीतसर परवानगी न घेतल्याने जिल्हाधिकारी यांनी सुद्धा कारवाई करायला पाहिजे.
बॅनर, पोस्टर, वृत्तपत्रातून वाटले जाणारे पॉम्पलेट,बिल, वजनकाटा, एक्सपायरी माल याची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी आणि दंड ठोठवावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
ग्राहकांनी काय काळजी घ्यावी?
1. कोणत्याही पॉम्पलेटच्या ऑफरमध्ये आधी MRP आणि ऑनलाईन किंमत तपासा. 2. बिल घेतल्याशिवाय खरेदी करू नका. 3. एक्सपायरी डेट, वजन, पॅकिंग तपासूनच घ्या. 4. फायनान्सचे कागद न वाचता सही करू नका. 5. फसवणूक झाल्यास 1915 हेल्पलाईनवर किंवा जिल्हा ग्राहक मंचाकडे तक्रार करा.



