सुवर्ण दिप
हेडलाईन्स, 6 जुलै 2021
▪️पावसाळी अधिवेशनात तालिका अध्यक्ष धक्काबुक्की प्रकरण भाजपला भोवलं, 12 आमदारांचं एक वर्षासाठी निलंबन. भाजपच्या सर्व 106 आमदारांचं निलंबन झालं तरी चालेल, पण ओबीसींच्या आरक्षणाचा लढा थांबणार नाही, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं प्रत्युत्तर. निलंबित 12 भाजप आमदार राज्यपाल कोश्यारी यांना भेटण्यासाठी राजभवनावर दाखल.
▪️OBC आरक्षणासाठी आवश्यक इम्पिरिकल डेटा केंद्रानेच द्यावा, जनगणनेचा तपशील केंद्राकडेच असल्याचा छगन भुजबळ यांचा दावा, डेटा देण्यासाठी विधानसभेत ठराव संमत.
▪️मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारने घटनादुरुस्ती करुन आरक्षणासाठी असलेली 50 टक्क्यांची मर्यादा उठवावी, नियम 110 अन्वये महाराष्ट्र विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहाचा एकमुखी ठराव.
▪️'एमपीएससी'चा कारभार गतिमान करण्यासाठी रिक्त सदस्यांची पदे 31 जुलैपर्यंत भरणार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही.. विद्यार्थ्यांमधील नैराश्य टाळण्यासाठी व्यवस्था उभारण्याचं आश्वासन
▪️कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचं नो टेन्शन; कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी आता चौथ्या लसीची भर पडणार. अमेरिकेच्या मॉडर्ना कंपनीची लस याच आठवड्यात भारतात दाखल होणार.
▪️IPL 2022 मध्ये मोठे फेरबदल; संघाची संख्या वाढवणार, BCCI कडून मेगा ऑक्शनची ब्लूप्रिंट तयार. दोन नवीन संघासाठी ऑगस्टमध्ये बोली लावण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार.
▪️गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या नागरिकांसाठी रेल्वेकडून स्पेशल ट्रेन्स. 5 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर दरम्यान विशेष ट्रेन चालवल्या जाणार. 8 जुलै 2021 पासून बुकिंग सुरु.
▪️रस्ते वेगळे आहेत मात्र मैत्री कायम; याचा अर्थ भाजपसोबत सरकार बनवणार असा नाही; फडणवीसांच्या वक्तव्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया.
▪️Tokyo Olympics : मेरी कोम, मनप्रीत सिंगची भारताचे ध्वजवाहक म्हणून निवड. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेचा उद्घाटन सोहळा २३ जुलै रोजी होणार.
▪️राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत मंत्रालयात स्वतंत्र 'सफाई कर्मचारी आयोग कक्ष' स्थापन, धनंयज मुंडेंनी शब्द पाळला.
▪️भीमा-कोरेगाव हिंसाप्रकरणात अटकेत असलेले फादर स्टॅन स्वामींचं वयाच्या 84 व्या वर्षी निधन. मुंबईतील होली फॅमिली रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास. पार्किनसन्ससह अनेक व्याधींनी होते ग्रस्त.
▪️पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसला मोठा झटका; प्रणव मुखर्जींचा मुलगा अभिजित मुखर्जीचा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश. बहिण शर्मिष्ठा मुखर्जी यांना खंत व्यक्त केली.
▪️धक्कादायक! मध्यरात्री घरात घुसून पोलीस हवालदारावर धारदार शस्त्रांनी वार; उपचारदरम्यान सोडला श्वास. गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यांतील धोडराज पोलीस मदत केंद्रांत कार्यरत होते.
▪️वायदा सोने स्वस्त, चांदीही घसरली. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचे भाव 39 रुपये वाढीसह 47324 प्रति 10 ग्रॅम. चांदीची किंमत 217 रुपये वाढीसह 70405 रुपये प्रती किलो झाली.


