Good Morning Maharashtra : आजच्या ठळक घडामोडी (हेडलाईन्स, 7 जुलै 2021)

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 सुवर्ण दिप 

    हेडलाईन्स, 7 जुलै 2021



✒️ जीएसटी महसुल सलग आठ महीने 1 लाख कोटी रुपयांच्या वर राहिल्यानंतर जून 2021 मध्ये 92,849 कोटींची वसुली


✒️ बीएचआर घोटाळ्याचा तपास: जितेंद्र कंडारे यांना पुण्यातून जळगावात आणले, मुख्य कार्यालयाच्या तळघरात 2500 फायली


✒️ पुणे एमआयडीसी जमीन व्यवहार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंच्या जावयाची ईडीकडून चौकशी


✒️ महाराष्ट्रात 1,14,297 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 58,72,268 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 1,23,531 रुग्णांचा मृत्यू


✒️ कोविड स्थितीमुळे घरातच ईदची नमाज अदा करा, बकरी ईद साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन; राज्याच्या गृह विभागाकडून सूचना देणारं पत्रक जारी


✒️ अहमदनगर: पाथर्डीत करंजीमध्ये डॉक्टरची लसीकरण केंदातच आत्महत्या; वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल, सुसाइड नोटच्या आधारे गुन्हा दाखल


✒️ गोल्फर उदयन मानेला टोक्यो ऑलिम्पिकचं तिकीट; जगभरातील 60 गोल्फर्स ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार 


✒️ हॉंगकॉंगच्या अधिकाऱ्यांनी डेटा संरक्षण कायद्यात नियोजित बदल केल्यास आम्ही देश सोडून जाऊ: फेसबुक, ट्विटर, गुगलकडून हाँगकाँगला धमकी


✒️ भारतात 4,54,516 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 2,97,91,967 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 4,04,240 रुग्णांचा मृत्यू


✒️ गंगेच्या पाण्याची चाचणी: 16 ठिकाणांहून कोरोना चाचणीसाठी घेण्यात आलेले नमुने निगेटिव्ह   


✒️ सॅमसंगने 6000 mAh क्षमतेची बॅटरी व 90 Hz रिफ्रेश रेट असलेला Samsung Galaxy F22 केला सादर; पहिला सेल 13 जुलैला दुपारी 12 वाजता फ्लिपकार्टवर


✒️ युरो चषकातील पहिल्या उपांत्य सामन्यात इटलीकडून स्पेनचा पेनल्टी शूटआऊटवर पराभव; इटलीनं 4-2 अशी बाजी मारली


✒️ सैफ अली खानचा चित्रपट 'भूत पोलिस' पोस्टर रिलीजनंतर वादाच्या भोवऱ्यात; नेटकऱ्यांनी व्यक्त केली नाराजी 


#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!