यावल वार्ताहर (सुरेश पाटील) यावल येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात भारतीय दंड विधान कलम नुसार फिर्यादीने अर्ज दाखल केला होता त्यानुसार दि.15/7/2021 रोजी दिवाणी व फौजदारी न्यायालय यावल यांनी यावल पोलिसांना आदेश देऊन फौजदारी प्र.सं.कलम156(3) प्रमाणे अहवाल सादर करण्याचा आदेश केल्याने यावल पोलिसांनी 2दिवसात म्हणजे दि.17 जुलै2021रोजी6आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.
[ads id='ads1]
याबाबत सविस्तर माहिती अशी की यावल येथील विरारनगर मधील रहिमा लुकमान तडवी वय 45 हिने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की दि.15/5/2021रोजी संध्याकाळी5ते6वाजेच्या दरम्यान यावल शहरात विरारनगर भागात फिर्यादीचे राहते घरात आरोपी 1)सुभान समशेर तडवी रा.यावल 2)आमीन सुभान तडवी,3)सलीम सुभान तडवी रा.ठाणे,4)तसलीम सुभान तडवी रा.यावल5)जैतून सुभान तडवी,रा.यावल6)नसिर उखर्डू तडवी रा.ईचखेड़ा ता.यावल हे त्यांचे हातात लाकडी पट्ट्या घेऊन घरात घुसून म्हणाले की मनोज कुठे (फिर्यादी चा मुलगा मनोज) असे विचारले त्याला बाहेर काढा तेव्हा आरोपी नं.2 आमीन सुभान तडवी याने माझा हात पकडला व आरोपी नं1 सुभान समशेर तडवी,आरोपी नं.3 सलीम सुभान तडवी,आरोपी नं.4 तसलीम सुभान तडवी,आरोपी नं.5 जैतून सुभान तडवी,आरोपी नं.6 नसिर उखडू तडवी यांनी संगनमताने माझी साडी सोडली व आरोपी नं.3 सलीम सुभान तडवी यांनी मला लोटुन दिले व तोंडावर बुक्का मारला. त्यानंतर साक्षीदार सलमान रहेमान पटेल, शेख बसीम अब्दुल गफूर,मेहमूद हबीब तडवी, अजीत अरमान तडवी,शब्बीर इस्माईल तडवी हे आले व त्यांनी मला व माझा मुलगा मनोज यास आरोपी यांच्या ताब्यातून सोडविले तेव्हा आरोपी बोलले की आज तुम्ही सुटले यापुढे आम्ही तुम्हाला मारून टाकू असे बोलले म्हणून या कारणावरून फिर्याद दिल्याने यावल पोलीस स्टेशनला भाग 5 गु.र.नं.132/2021 भा.द.वि.कलम354,452,143,147,341,325,324,323,,504,506,34 प्रमाणे6आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा तपास पो.नि.सुधीर पाटील यांचे आदेशान्वये ए.पी.आय.अजमल पठाण करीत आहे.
याबाबत फिर्यादी महिलेने दि.15 मे 2021रोजी व त्यानंतर यावल पोलीस स्टेशनला जाऊन लेखी व तोंडी फिर्याद देण्याचा प्रयत्न केला होता आणि आहे परंतु यावल पोलिसांनी त्यावेळेस गुन्हा दाखल न केल्यामुळे अनुसूचित जमातीच्या महिलेला/ फिर्यादीस यावल येथील न्यायालयात जाऊन न्याय मागणी करावी लागली ही सामाजिक दृष्ट्या दुर्दैवाची घटना ठरली, याबाबत यावल न्यायालयाने चौकशी चौकशी करून अहवाल 60 दिवसाच्या आत यावल न्यायालयात अहवाल सादर करण्याचा आदेश यावल पोलिसांना दिल्याने यावल पोलिसांनी 2 दिवसात गुन्हा दाखल केला आहे यामुळे आरोपीता मध्ये एकच खळबळ उडाली आहे.