शिक्षण क्षेत्रात आपलं करिअर घडवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना सुवर्णसंधी चालून आली आहे.'शिक्षक पात्र परीक्षा'(MAHATET, 2021)...
मुंबई(सुवर्ण दिप वृत्तसेवा) : राज्यातील शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. आता शिक्षक भरतीस पात्र ठरण्यासाठी होणारी परीक्षा घेण्याचा शिक्षण विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय झाला आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET) 15 सप्टेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत होणार आहे.
तर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील अंदाजे 27 हजार, आणि माध्यमिक शाळेतील अंदाजे 13 हजार अशी एकूण 40 हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत. शिक्षण विभाग टप्प्याटप्प्याने या जागा भरणार आहे. पहिल्या टप्प्यात 6100 जागा भरण्यात येणार आहेत.
दोन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर नंतर परीक्षा
शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी परीक्षा तब्बल दोन वर्षांनंतर घेण्यात येत आहे.