लोकप्रतिनिधीनी लक्ष घालण्याची ग्रामस्थांची मागणी
रावेर प्रतिनिधी (प्रमोद कोंडे) रावेर तालुक्यातील निंभोरा बु. गावालगत असलेला निंभोरा- विवरा फाटा रस्त्याची दैनंनिय व्यवस्था झाली आहे. रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते हे वाहनधारकांना समजणे कठीण झाले आहे.वार्ड नं दोन मधील प्लॉट धारकांचे पाणी हे गटारीचे नियोजन नसल्याने सरळ रस्त्यावर येत असते. तसेच पीव्हीसी पाईपाद्वारे काही प्लॉट धारकांनी सांडपाणी मेन गटारीत सोडलेले आहे. हा रस्ता गावंदरवाज्या पासून तर सब - स्टेशन पर्यंत एकदम खराब झालेला आहे. रस्त्याच्या दुतर्फा गटारी नसल्यामुळे पाणी रोडवर जमा होऊन चिखल तयार होऊन गड्डे पडत आहे. यामुळे वाहन धारकांना वाहन चालविणे तसेच पायी चालणे ही कठीण होऊन बसले आहे .
[ads id='ads1]
हा रस्ता स्व. माजी आमदार हरिभाऊ जावळे यांनी मंजूर केलेला होता.जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून, वाहन धारकांमधून होत आहे. बागायती आणि केळीबेल्टचा परिसर असल्याने या रस्त्यावरून कायम अवजड वाहनांची वर्दळ असते. मात्र जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनांची ने - आन शेतमालाची वाहतूक करतांना शेतकरी, व्यापाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. आ. शिरीष चौधरी, आणि माजी जि. प. उपाध्यक्ष तथा जि. प. सदस्य नंदुु महाजन यांनी रस्त्याच्या दुरुस्ती कडे लक्ष देऊन शेतकरी, गावकरी यांची रस्त्याविषयी समस्या सोडवावी व हा प्रश्न मार्गीं लावावा.