यावल पंचायत समितीतील ८ अधिकारी व एक शिपाई यांची बदली यात 4 ग्रामसेवक 1 ग्रामविकास अधिकारी यांचा समावेश.

अनामित
यांच्या काहींच्या कार्यकाळातील तक्रारी आणि चौकशीचे काय?
यावल वार्ताहर (सुरेश पवार ) येथील पंचायत समितीत कार्यरत असलेला1ग्रामविकास अधिकारी व4ग्रामसेवक एकुण पाच जणांच्या प्रशासकीय पातळीवर बदल्या झाल्याचे विश्वनिय वृत्त आहे.यांच्या काहींच्या कार्यकाळातील तक्रारी आणि चौकशीचे काय?असा प्रश्न तालूक्यातील ग्रामस्थांमध्ये उपस्थित केला जात आहे.

या संदर्भातील वृत्त असे की यावल पंचायत समिती अंतर्गत तालुक्यातील कोरपावली ग्रामपंचायतचे ग्रामसेवक प्रविण सपकाळे व शिरसाडचे आर.जी. चौधरी यांची रावेर तालुक्यात तर पाडळसा ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी एल.एन. नहाले यांची भुसावळ तालुक्यातील केऱ्हाळे व सांगवी खुर्द ग्रामपंचायतचे ग्रामसेवक राहुल तायडे यांची भुसावळ व बोरावल बु॥ व खुर्द दोघ ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक नागनाथ गायकवाड यांची मुक्ताईनगर येथे बदली झाली असल्याचे खात्रीलायक वृत्त असुन अद्याप प्रशासकीय पत्र प्राप्त झाले नसले तरी त्यांनी बदल्या करण्यात आल्याच्या विषयास दुजोरा येथील पंचायत समितीचे ग्रामविस्तार अधिकारी तथा प्रभारी गटविकास अधिकारी किशोर सपकाळे यांनी सदरच्या बदली संदर्भातील माहीतीस दिला आहे. 

दरम्यान यावल पंचायत समितीतील शिक्षण व समाजकल्याण विभागातील विभागातील वरिष्ठ सहाय्यक मनोज भरत पाटील यांची जळगाव बांधकाम विभागात तर ग्रामपंचायत विभागातील वरिष्ठ सहाय्यक के.एल.पाटील यांची रावेर पंचायत समितीला व शिक्षण विभागातील गुणवंत डिंगबर देवराज यांची चोपडा पंचायत समितीमध्ये तर शिपाई मोहन हरी हिरळकर यांची मुक्ताईनगर पंचायत समितीच्या बांधकाम विभागात बदली झाली आहे. यांच्यापैकी काही ग्रामपंचायती बाबत आणि शासकीय कारभाराबाबत ग्रामस्थांच्या तोंडी किंवा लेखी तक्रारी आहेत तसेच ग्रामपंचायतीच्या लेखापरीक्षणात काय आढळून आले?त्या चौकशीबाबत काय?असे अनेक प्रश्न तालुक्यात उपस्थित केले जात आहेत.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!