रावेरमध्ये गावठी कट्ट्यासह दोघांना अटक : रावेर पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 

रावेरमध्ये गावठी कट्ट्यासह दोघांना अटक :रावेर पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन

रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) विनापरवाना गावठी पिस्तुल बाळगल्या- प्रकरणी रावेर शहरातील दोघांना रावेर पोलिसांनी (Police) सोमवारी पहाटे पहाटे अटक करून रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेने रावेर मध्ये एकच खळबळ उडाली आहे.
  रावेर शहरातील कुंभार वाड्यातील रहिवासी महेंद्र अर्जुन प्रजापती वय-२५ याच्या घरातून २० हजार रुपये किंमतीचे गावठी पिस्तुल व ३ जिवंत काडतुसे रावेर पोलिसांना मिळून आली आहे.सदर कारवाई ही सोमवार रोजी (दिनांक १२जुलै २०२१) पहाटे- पहाटे सुमारे ३ वाजेच्या सुमारास करण्यात आली असून यात दुसरा आरोपी रवींद्र राजाराम प्रजापती याला देखील रावेर पोलिसांनी अटक केली असून रावेर पोलीस स्टेशन चे पो.कॉन्स्टेबल सुभाष पाटील यांच्या फिर्यादीवरून आर्म अँक्ट प्रमाणे आरोपीवर रावेर पोलिसात गुन्हा दाखल झाला असून, सदर घटनेचा पुढील तपास  रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनखाली इस्माईल शेख हे करत आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!