रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) रावेर तालुक्यातील अनिल वराडे, विजय पाटील,राहुल लोखंडे, छाया नेमाडे, संतोष मोरे, शामकुमार पाटील आणि रविंद्रकुमार चौधरी या ग्रामसेवक यांच्या बनावट अपंगत्व प्रमाणपत्र दाखवून बदलीचा व अन्य लाभ पंचायत समिती प्रशासनाशी संगनमत करून पदरात पाडून घेतल्याचं प्रकरण ताजे असतांना ग्रामसेवक संघटनेचे प्रभारी अध्यक्ष शिवाजी सोनवणे यांनीही एन्जोप्लास्टी झालेली असताना हृदय शस्त्रक्रिया झाल्याचे भासवून वर्ष दोन वर्षे नव्हे तर तब्बल १० वर्ष वाघोदा खुर्द येथून बदलीचा हुलकावणी देण्याचा विक्रम केल्याने त्यांचे विरुद्ध प्रशासकीय आणि फौजदारी कारवाई होण्यासाठी किशोर तायडे यांनी गटविकास अधिकारी,रावेर यांचेकडे तक्रार दाखल केली आहे.
किशोर तायडे यांना सहायक गट विकास अधिकारी श्री डी एच सोनवणे यांनी महितीच्या अधिकारात पुरविण्यात आलेल्या माहितीत ही बाब उघड झालेली असतानाही पंचायत समिती प्रशासन शिवाजी सोनवणे यांना पाठीशी घालत असल्याने निंबोल ता रावेर येथील किशोर तायडे यांनी बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे.तक्रारीची प्रत जिल्हा परिषद, जळगांव येथील मुख्य कर्यकारी अधिकारी यांना पाठविण्यात आली आहे.
हे पण वाचा >> रावेरमध्ये गावठी कट्ट्यासह दोघांना अटक : रावेर पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन


