सावदा येथील आ.गं. हायस्कुलच्या १० वीचा : १०० % निकाल

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 रावेर प्रतिनिधी (राजेंद्र अटकाळे) दहावी माध्यमिक शालांतर प्रमाणपत्र परिक्षेत श्री आ.गं हायस्कुल व ना. गो. पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला असून सर्वच्या सर्व विध्यार्थी चांगल्या मार्क्स मिळवून उत्तीर्ण झाले आहे.

     सावदा नगरपालिका संचालित श्री आ.गं हायस्कुल व ना. गो. पाटील कनिष्ठ महाविद्यालय मधील दहावी माध्यमिक शालांतर प्रमाणपत्र परिक्षेचा निकाल दिनांक १६ जुलै शुक्रवार रोजी जाहीर झाला. यात ६१ विध्यार्थी प्रविष्ठ झाले होते ते सर्व विद्यार्थी पास झाले असून १०० टक्के निकाल लागला आहे. निकालानुसार ८९% मिळून मेथाडकर पियुष राजेंद्र याने प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा बहुमान मिळविला आहे. तर ८७.८०% मिळून चौधरी पराग दीपक याने दुसरा क्रमांक पटकावला असून गुण मिळवून यश संपादन केले आहे. शालांत परिक्षेचा विद्यालयाचा निकाल चांगला लागला आहे.

सावदा येथील आ.गं. हायस्कुलच्या  १० वीचा  : १०० % निकाल

   सर्व शालांत परिक्षेतील यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन सावदा नगरीच्या नगराध्यक्षा सौ.अनिता येवले, उपनगराध्यक्ष विश्वास चौधरी, शिक्षण समिती सभापती- सौ. रंजनाताई जितेंद्र भारंबे, सावदा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सौरभ जोशी, गटनेते अजय भारंबे, विरोधी गटनेते फिरोजखान हबीबुल्ला खान पठाण, नगरसेवक राजेश वानखेडे , राजेंद्र चौधरी तसेच सर्व आजी – माजी नगराध्यक्ष व सर्व सन्माननीय नगरसेवक, नगरसेविका यांनी त्यांचे मिळवलेल्या यशाबद्दल अभिनंदन केले आहे. प्राचार्य सी. सी. सपकाळे, पर्यवेक्षक जे. व्ही. तायडे, यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतूक व अभिनंदन केले आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!