पाचोरा पोलिसांचा प्रामाणिकपणा ; सापडलेला मोबाईल केला परत

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 पाचोरा (सुवर्ण दिप वृत्तसेवा) पाचोरा येथील पुनगाव रोड परीसरात सागर सुरेश पाटील  या तरूणाचा मोबाईल पुनगाव रस्त्यावर दुपारी ०२:३० ते ०३:०० वाजे दरम्यान हरवला होता. त्या नंतर  पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत पोलिस नाईक राकेश खोंडे व पाचोरा येथील सामाजिक कार्यकर्ते विशाल हटकर, हे दोघे मोटारसायकल ने पुनगाव रस्त्यावर जात असतांना सदर ओपो कंपनी मोबाईल रस्त्याचा कडेला पडलेला निदर्शनास आला. त्यावेळी तो मोबाईल बंद होता. सदर मोबाईल पोलिस नाईक राकेश खोंडे,विशाल हटकर यांनी तो मोबाईल प्रामाणिक पणाने पाचोरा पोलीस स्टेशनला जमा केला.  

पाचोरा पोलिसांचा प्रामाणिकपणा ; सापडलेला मोबाईल केला परत

  सागर सुरेश पाटील या तरूणाने मोबाईल हरवल्याची तक्रार पाचोरा पोलीसात दाखल केली होती. पोलीसांनी मोबाईलचे बील तपासुन जमा केलेला मोबाईल पाचोरा पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक विजया वसावे, ठाणेअंमलदार सुर्यकांत नाईक, पोलिस नाईक राकेश खोंडे, प्रशांत पाटील, विशाल हटकर यांच्या समक्ष तरूणास मोबाईल देण्यात आला.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!