चेन्नई - तामिळ(Tamil) बिग बॉसमधून(Big Boss) प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री यशिका आनंद यांचा अपघातात झाल त्या गंभीर जखमी झाल्या आहेच तर त्यांची मैत्रिण वल्लिचेट्टी भवानी हिचा घटनास्थळी मृत्यू झाला आहे.
अपघाताबाबत मिळालेल्या माहितीनुसार अती भरधाव वेगात एक कार ईसीआर रोडवरून जात होती. या कारने सेंटर मीडियनला जोरात धडक दिली आणि ही कार(car) एका खड्ड्यात जाऊन पडली. त्यानंतर तिथे असलेल्या लोकांनी अपघातग्रस्त कारकडे धाव घेत मदतकार्य सुरू केले.
अपघातग्रस्त कारमधून तीन जणांना बाहेर काढण्यात आले. ज्यामध्ये यशिका आनंद हिचाही समावेश होता. तिघांनाही जवळच्या रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले. यशिका हिची मैत्रिण वल्लिचेट्टी भवानी ही अपघातग्रस्त कारमध्ये अडकली होती. तिला वाचवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत होते. मात्र गंभीर जखमा झाल्याने तिचा घटनास्थळावरच मृत्यू झाला.