Good News : भारताला मिळालं सुवर्णपदक, कुस्तीपटू प्रिया मलिकने जिंकले सुवर्णपदक

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

सुवर्ण दिप वृत्तसेवा >>>  जागतिक कुस्ती स्पर्धेत भारतीय कुस्तीपटू प्रिया मलिकने गोल्ड मेडल जिंकत इतिहास घडवला आहे. यापूर्वी काल मिराबाई चानूने ऑलिम्पिक वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक जिंकत इतिहास रचला होता त्यानंतर आता प्रिया मलिकने मिळवलेल्या गोल्ड मेडलमुळे आनंद व्यक्त होत आहे.

प्रियाने बेलारूसच्या कुस्तीपटूला 5-0 च्या फरकाने पराभूत करत हे सुवर्ण पदक मिळवलं आहे. प्रियाने 2019 मध्ये पुण्यात खेलो इंडियामध्येही सुवर्ण पदक पटकावलं होतं. त्याचवर्षी 2019 मध्ये दिल्लीमध्ये 17 व्या स्कूल गेम्समध्येही तिने सुवर्ण जिंकलं असून 2020 मध्ये पटना येथील नॅशनल कॅडेट चॅम्पियनशिपमध्येही तिने सुवर्ण पदक मिळवलं आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!