यावल वार्ताहर (सुरेश पाटील) यावल तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून रिमझिम पाऊस सुरू असल्याने पावसाचे पाणी झिरपुन घराची भिंत कोसळून भिंतीखाली चार वर्षांचा बालक जागीच ठार झाल्याची घटना तालुक्यातील मालोद येथे आज दुपारी घडली असल्याची माहिती नायब तहसीलदार आर.के.पवार यांनी दिली.
मालोद तालुका यावल येथील इमाम तडवी यांच्या घराची मातीची भिंत आज दिनांक 25 रविवार रोजी बारा वाजेच्या सुमारास कोसळून त्यांचा मुलगा आबीद इमाम तडवी वय 4 भिंतीखाली दबून जागीच ठार झाला याबाबत महसूल तर्फे तात्काळ दखल घेण्यात आली असून तलाठी,सर्कल यांनी पंचनामा केला व पुढील कार्यवाही सुरू आहे.